UDDHAV THACKERAY TARGETS EKNATH SHINDE 
महाराष्ट्र

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Speech: धाराशिव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदेंसह ओमराजे निंबाळकर यांच्यावरही हल्लाबोल केलाय.

Bharat Jadhav

  • धाराशिव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

  • "गद्दारांचे नशीब फिरवू आणि भगवा फडकवू" असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

  • विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सभेत त्यांनी शिंदे गटावर तीव्र टीका केली.

गद्दारांचे नशीब फिरवल्याशिवाय राहणार नाही, कितीही गद्दारी करा, तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिदेंवर टीकेची तोप डागली. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते आज धाराशिवमध्ये सभा घेत आहेत.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. गद्दारांचे नशीब फिरेल आणि त्यांच्या उरावर भगवा फडकावू असा निर्धार करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर तोफ डागली. ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्यानंतर ठाकरेंनी नव्याने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सध्या ते बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी तीन खासदार आणि आमदार कैलास पाटील, प्रविण स्वामी यांचे निष्ठेचं कौतुक केलं.

भाजपनं जेव्हा गद्दारी केल्याच कळलं त्यावेळी खासदार असलेले अरविंद सावंत यांनी खासदारकीला लाथ मारत सत्ता सोडली होती. २०१९ मध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करत फोडाफोडीचं राजकारणात गुंतवलं होतं. त्यावेळी कैलास पाटील यांनीही शिंदे गुजरातला घेऊ जात होते, त्यावेळी तेही सत्ता सोडून माघारी परत आल्याचं ठाकरे म्हणाले.

दरम्यान शिंदे गटात गेलेले खासदार यांनी विकास निधी मिळत नसल्यानं मतदारसंघातील कामे होत नसल्याची बोंब ठोकत सत्तेच्या गादीवर जाऊन बसले. त्यावरून ठाकरेंनी जोरदार टीका केली. नुसता विकासनिधी निधी करून उपयोग नाही.

निष्ठावंत कार्यकर्ते मिळण्यास भाग्य लागतं असं उद्धव ठाकरे म्हणाले. ओमराजे यांना फुकटचा पैसा हवा होता, त्यामुळे ते तिकडे गेले आहेत. परंतु माझ्यासमोर कष्टाने पैसा कमावणार शेतकरी आणि अस्सल शिवसैनिक बसलाय असंही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT