डॉक्टरच्या हत्येप्रकरणी यवतमाळमध्ये शिकाऊ डाॅक्टरांचं काम बंद आंदोलन Saam TV
महाराष्ट्र

डॉक्टरच्या हत्येप्रकरणी यवतमाळमध्ये शिकाऊ डाॅक्टरांचं काम बंद आंदोलन

एका डॉक्टराचा शुल्लक कारणावरून दोघांनी चाकुने वार करून खुन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री दरम्यान उघडकीस आली.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ- यवतमाळ शहरात नवरात्रीत दि. १२ ऑक्टोबर च्या रात्री दुहेरी हत्याकांड ची घटना घडली. त्याची शाई वाळत नाही तर पुन्हा येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील एका डॉक्टराचा शुल्लक कारणावरून दोघांनी चाकुने वार करून खुन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री दरम्यान उघडकीस आली. डाॅ.अशोक पाल असे मृत डाॅक्टरांचे नाव आहेत.

यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. अशोक पाल एमबीबीएस मध्ये तृतीय वर्षात कार्यरत होता. शेवटचे त्याचे तीन महिने उरले होते. मृतक हा ठाणे (मुंबई) येथील रहवाशी होता. बुधवारी रात्री वैधकिय महाविद्यालय येथील परिसरातून डॉक्टर अशोक पाल जात असताना संशयित मारेकऱ्यांनी त्यांना वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील नागरिकांसह डॉक्टरांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत डाॅक्टर पालला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टर पालचा मृत्यू झाला.

डाॅक्टर चा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शिकाऊ डाॅक्टरांनी डीन, जिल्हा अधिकारी आणि एसपी विरोधात तीव्र रोष व्यक्त करित घोषणा बाजी केली. गुरूवारी सकाळ पासून शासकीय महाविद्यालयातील सर्व दरवाजे बंद करून काम बंद आंदोलन सुरू केल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. परिविक्षाधीन डॉक्टरांनी आक्रमक पाऊल उचलत डीन साहेब मुर्दाबाद, पोलिस प्रशासन मुर्दाबाद नारेबाजी करीत रुग्णालय परिसर दणाणून सोडला. डॉक्टर पाल यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करीत कठोर शिक्षा करा, या मागणीसाठी रुग्णालय परिसरात सकाळ पासून ठीय्या आंदोलन सुरू आहे.

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सीसीटीव्ही नाहीत, लाईट देखिल नाही, त्यामुळे शिकाऊ डाॅक्टरांमध्ये तीव्र रोष व्यक्त केल्या जात असून बुधवारी डाॅक्टर अशोक पाल यांची हत्या झाल्याचे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरण्याची भावना शिकाऊ डाॅक्टर बोलून दाखवत आहे. दरम्यान यवतमाळ शहर पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT