Solapur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Accident: डंपरची दुचाकीला जोरदार धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Solapur Police: सोलापूरमध्ये डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये भीषण अपघातामध्ये एकाच गावातील ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यात ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेल्या तिघांनी जागीच प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे जण ठार झाले. तिघेही मित्र एकाच गावातील होते. धोत्री गावातून ते कामाकडे जात असताना हा अपघात झाला. तिघेही बांधकाम कामगार होते. सकाळी नेहमीप्रमाणे ते कामाला जाण्यासाठी एकाच दुचाकीवरून निघाले आणि वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला.

दक्षिण सोलापूरातील धोत्री ते मुस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या विचित्र अपघात तिघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकीस पडले. या अपघातामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT