Sangali| भावाचा साप चावल्याने मृत्यू; रक्षाविसर्जनासाठी आलेल्या बहिणीचाही केला त्याच सापाने अंत ! विजय पाटील
महाराष्ट्र

Sangali| भावाचा साप चावल्याने मृत्यू; रक्षाविसर्जनासाठी आलेल्या बहिणीचाही केला त्याच सापाने अंत !

विराज झोपेत असताना मध्यराञी अंथरूणातच मण्यार जातीच्या सापाने दंश केला होता.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : घरात लपून बसलेल्या मण्यार जातीच्या सापाने दंश Snake bites केल्यामुळे दोघा भावा बहिणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद Aalsand येथे घडली आहे. या घटनेने आळसंद गावात शोककळा पसरली आहे.

भावाला विषारी मण्यार जातीच्या सापाने दंश केला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला होता. सख्खा भाऊ मयत झाल्याने बहीण Sister सासरहून माहेरी आली होती आणि त्याच सापाने दुसऱ्या दिवशी बहिणीलाही दंश केला. या दुर्दैवी घटनेत भावाचा लगेचच अंत झाला मात्र आठ दिवसापासून उपचार घेणाऱ्या बहिणीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बहिण-भावाच्या या अकाली निधनाने माञ सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यातील आळसंद येथील विराज सुनिल कदम वय 16 आणि सौ. सायली जाधव वय 22 अशी मृत्यूमुखी पडलेल्या बहिण-भावांची Sibling death नावे आहेत. (Tragic death of two brothers and sisters due to snake bite)

हे देखील पहा -

विराज यास दि. 6 ऑक्टोंबर रोजी मध्यराञी घरी झोपेत असताना अंथरूणातच मण्यार जातीच्या सापाने दंश केला होता. सकाळपर्यंत त्याला काय झाले हे घरात कोणालाही न समजल्याने उपचारासाठी रुग्णालयात Hospital नेतानाच त्याचा अंत झाला. विराजच्या रक्षाविसर्जन विधीसाठी त्याची विवाहित बहिण सायली जाधव या माहेरी आल्या होत्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी होता मात्र गुरूवारी रात्री सर्वजण झोपले असतानाच घरातच वास्तव्यास असणाऱ्या मण्यार सापाने सायली यांनाही दंश केला. सायली यांना तात्काळ विटा Vita येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला Sangali हलविण्यात आले. परंतू गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणाऱ्या सायली यांचीही तब्बेत दोन दिवसात जास्तच बिघडली. अखेर शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान सायली यांचाही मृत्यू झाला.

आईपासून मुलीची कायमची ताटातूट -

सायली यांना एक वर्षांची मुलगी असून त्यांना सर्पदंश झाल्यापासून ती आईपासून वेगळी होती आणि अखेर काळाने या आई लेकीची कायमचीच ताटातूट केली आहे. मयत मुलांचे वडिल सुनिल कदम हे शेतकरी असून टेलरिंगचा व्यवसाय करतात त्यांना विराज हा एकुलता एक मुलगा व दोन मुली होत्या मात्र मुलगा आणि मुलगी गेल्याने कुटुंबावर दुख:चा मोठा डोंगर कोसळला आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात या कुटुंबाचा आधारच संपल्याने शासनाने याचा विचार करुन कुटुंबाला ठोस मदत देणे गरजेचे आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT