death of 12 year old boy due to electric pole shock in Jalna लक्ष्मण साळुंके
महाराष्ट्र

Jalna : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे १२ वर्षीय मुलाचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू

Jalna Electric Shock News : दोन दिवसांपासून विद्यूत प्रवाह उतरत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत महावितरणला कळवले होते.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका १२ वर्षांच्या निष्पाप मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना जालना (Jalna) शहरातील नूतन वसाहत परीसरातील राहुल नगरमध्ये घडली आहे. सूर्यकांत उर्फ मोनू सर्जेराव म्हस्के अस मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. मोनू हा काल सायंकाळी राहुल नगर परिसरातील गल्लीत खेळत असताना त्याचा अचानकपणे महावितरणाच्या विद्यूत पोलला (Electric Pole) हात लागल्याने विद्यूत पोलमध्ये विजेचा प्रवाह असल्याने मोनूला विजेचा शॉक (Electric Shock) लागल्याने तो पोलला चिकटला. (Tragic death of 12 year old boy due to electric pole shock in Jalna)

हे देखील पाहा -

नागरिकांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय दाखल केले असता शॉक लागून त्यांचा दुर्दवी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर परीसरात एकच शोककळा पसरली. दरम्यान राहुल नगर परिसरात विद्यूत पोलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विद्यूत प्रवाह उतरत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत महावितरणला कळवले होते. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोनूचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT