Nashik Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव ट्रकच्या धडकेनंतर पिकअपने घेतला पेट, चौघांचा होरपळून मृत्यू

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने पिकअपला धडक दिली. या अपघातानंतर पिकअपने पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

Priya More

Summary Points -

  • सिन्नरमध्ये ट्रक-पिकअपचा भीषण अपघात

  • अपघातानंतर पिकअपने पेट घेतला

  • आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू तर दोघे जखमी

  • अपघातात मृत्यू झालेले सर्वजण एकाच गावचे

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघातामध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव ट्रकने पीकअपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर पीकअपने पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमावरून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यात पंचाळे जवळ हा भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर पिकअपने पेट घेतला. या अपघातामध्ये बाहेर फेकल्या गेलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांना पिकअपमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघाताची माहिती मिळताच सिन्नरच्या रुग्णवाहिका, सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री मदतकार्य केले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघे जण सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावातील रहिवासी होते. मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

मृतांमध्ये नवरा-बायको यांचा समावेश आहे. या अपघातातील मृतांची नावं समोर आली आहेत. पिकअप चालक किरण रवींद्र मोरे (२५ वर्षे), शुभम गणेश नवले (२२ वर्षे), रिंकू शुभम नवले (१९ वर्षे), मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे (३५ वर्षे) अशी मृतांची नावं समोर आली आहेत. सचिन गणेश नवले, सुनिता गणेश नवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT