Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Traffic Update : जरांगेंचे बुधवारी चलो मुंबई! आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीत बदल; वाचा सविस्तर

Sambhajinagar : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाहतूक बदल करण्यात आला आहे. महामार्गावर गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित.

Alisha Khedekar

  • मराठा आरक्षण आंदोलनासाठी हजारोंचा ताफा मुंबईकडे कूच

  • बीड-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी

  • पर्यायी मार्ग निश्चित, वाहनधारकांना खबरदारीचे आवाहन

  • पोलीस आणि वाहतूक विभाग सतर्क, अतिरिक्त कुमक तैनात

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करणार असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये वाहतूक व्यवस्था बदलण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मोर्चेकरी मुंबईकडे रवाना होणार असल्याने बीड-पुणे महामार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून वाहतूक वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतरवाली सराटी येथून निघणारा हा मोर्चा शहागड, तुळजापूर, पैठण आणि शेवगावमार्गे २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचेल. या मोर्चामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह इतर भागातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत. चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या मोठ्या ताफ्यातून हे मोर्चेकरी मुंबईकडे निघणार असल्याने महामार्गावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यामुळे बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत काही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत. या दरम्यान पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठणमार्गे शेवगावकडे जाणारी वाहने वाळूज, गंगापूर, नेवासा मार्गे वळविण्यात येणार आहेत. तर शहागड, हिरडपुरी, तुळजापूर, नवगाव मार्गे पैठणकडे जाणारी वाहने शहागड, डोणगाव, पाचोडमार्गे नेण्यात येतील. पैठण, नवगाव, हिरडपुरीमार्गे शहागडकडे जाणारी वाहने पाचोड, डोनगावमार्गे शहागडकडे वळविण्यात येणार आहेत.

या बदललेल्या मार्गांमुळे वाहनधारकांनी काळजीपूर्वक नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आंदोलनाच्या काळात रस्त्यांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस दल, वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे राज्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले असून, हे आंदोलन किती तीव्रतेने पार पडते आणि सरकारकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimple Warning : मुरुम काढण्याच्या निष्काळजीपणाने थेट मेंदूला धोका, या सामान्य समस्येला दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचं आंदोलनही मुंबई धडकणार

पुणे - नाशिक प्रवास होणार जलद; २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर, कुठून कसा असणार एलिव्हेटेड मार्ग?

Vande Bharat: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू, थांबा- तिकीट अन् वेळापत्रक काय? वाचा सर्वकाही

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा मोठा निर्णय, नर्हे ते देहू रोडपर्यंत पुणे-बेंगळुरू एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

SCROLL FOR NEXT