Bribe News :  Saam tv
महाराष्ट्र

Bribe News : लाचखोरीही डिजिटल झाली; वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांची लाच फोन पेवरून घेतली, VIDEO व्हायरल

Chhatrapati sambhajinagar Bribe News : लाचखोरीही डिजिटल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांची लाच फोन पेवरून घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : लोकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. तरुण असो किंवा ज्येष्ठांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. छोट्या-मोठ्या दुकानतही आता डिजिटल व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे अनेक जण रोखीने व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल व्यवहारावर भर देताना दिसत आहेत. आता लाचखोरी देखील डिजिटल झाल्याचे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चक्क डिजिटल लाचखोरीचा व्हिडिओ समोर आला आहे. एका पोलिसाने चक्क फोन पेवरून लाच स्वीकारल्याची बाब समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांनी पाचशे रुपयांची लाच घेतल्याची बाब समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क ५०० रुपयांची लाच फोन पेवरून घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सेवन हिल परिसरातील घटना असल्याची बाब समोर आली आहे.

फोन पेवरून ५०० रुपयांचा लाच घेतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. सीट बेल्ट लावला नसण्याच्या कारणावरून अडीच हजारांचा दंड वाचवण्याऐवजी वाहन चालकाने ५०० रुपयांचा लाच दिल्याची बाब समोर आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने अंबिका पान सेंटर या फोन पे अकाउंटवर पाचशे रुपयांची लाच स्वीकारली. लाचखोरीचा धक्कादायक प्रकार सर्वत्र व्हायरल होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरच्या सेवन हिल परिसरात डिजिटल लाचखोरीचा प्रकार घडला आहे. एका वाहनचालकाने सीट बेल्ट लावला नव्हता. सीट बेल्ट लावला नसल्याने वाहतूक पोलिसाने त्याला २५०० रुपयांचा दंड सांगितला. वाहनचालकाने २५०० रुपयांचा दंड वाचवण्याऐवजी लाच दिली. या वाहनचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला ५०० रुपयांची लाच ही डिजिटल पद्धतीने दिली.

या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अंबिका पान सेंटर या फोन पे अकाऊंटवर ५०० रुपयांची लाच स्वीकारली. या पोलीस कर्मचाऱ्याला लाच देताना वाहनामधील एकाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली.

आता या डिजिटल लाचखोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिजिटल लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पैसे देणाऱ्याला अन् घेणाऱ्याला बेड्या ठोकल्या, मध्यरात्री संभाजीनगरचं वातावरण तापलं; ठाकरेसेना अन् शिंदेसेना आमनेसामने!

Success Story: दिवस रात्र एक करुन अभ्यास केला,UPSC क्रॅक केली, दिव्यांग IAS ऑफिसर इरा सिंघल यांचा प्रेरणादायी प्रवास

Viral Video: बापरे...सोफ्याच्या आत सापांचा घोळका; VIDEO पाहून अंगाचा उडेल थरकाप

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

SCROLL FOR NEXT