Satara Kass Road Closed, Satara News, Kass, Satara Hill Half Marathon saam tv
महाराष्ट्र

Kass Pathar Satara : पर्यटकांनाे ! रविवारी कास पठारला जाणार आहात? वाहतुकीसाठी यवतेश्वर घाट राहणार बंद, जाणून घ्या कारण

satara hill marathon 2023 : शेख यांनी काढलेल्या आदेशात वाहतुकीतील बदल हा पहाटे पाच ते सकाळी ११ पर्यंत लागू राहणार आहे.

Siddharth Latkar

Satara News : सातारा हाफ हिल मॅरेथॉन निमित्त उद्या (रविवार) शहर व परिसरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख (ips sameer shaikh) यांनी काढला आहे. (Maharashtra News)

सातारा रनर्स फाउंडेशन गेली 11 वर्ष सातारा हिल हाफ मॅरेथाॅनचे आयाेजन करीत आहे. यंदा स्पर्धेचे हे १२ वे वर्ष आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील नामवंत धावपटू सहभागी हाेत असतात. पोलीस कवायत मैदानापासून या स्पर्धेस प्रारंभ हाेताे. यवतेश्वर घाट (yavteshwar ghat) मार्गातून मार्गक्रमण करीत धावपटू पुन्हा साता-यात येतात.

या स्पर्धेनिमित्त यवतेश्वर घाट सकाळी 11 पर्यंत (दाेन्ही बाजूने) वाहतुकीस बंद राहणार आहे. यामुळे कास बाजूकडून येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना एकीव फाटा- एकीव -मोळेश्‍वर- कुसुंबीमुरा -कुसुंबी- मेढा हा मार्ग खुला ठेवण्‍यात आला आहे.

साता-यातील वाहतुक मार्गातील बदल

शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे साताऱ्यात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटरमधून डी. बी. कदम मार्केट- राधिका सिग्नल येथून ये- जा करतील.

बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून शहरात येणारी सर्व वाहने जिल्हा परिषद- कनिष्क हॉल चौक- रिमांड होम मार्गे जुना आरटीओ चौक अथवा बांधकाम भवन, आरटीओ ऑफिस, मुथा चौक, रिमांड होम, भूविकास बँक चौकातून साताऱ्यात ये-जा करतील.

मुख्य बस स्थानक- राधिका सिग्नल- तहसील कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने जातील.

सज्जनगड, ठोसेघर, परळीकडून येणारी- जाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक व गोडोली मार्गे शहरात येऊन ग्रेड सेपरेटरमधून बस स्‍थानकाकडे ये-जा करतील.

वाहनतळासाठी व्यवस्था

स्‍पर्धकांना वाहने बस स्‍थानकाजवळील प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या मैदानामध्ये, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद ग्राउंड रस्त्याच्या दोन्ही बाजूस, जुना आरटीओ चौक ते सुभाषचंद्र बोस चौक, करंजे नाका जाणाऱ्या रस्त्यावर दक्षिण बाजूस लावण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT