संतापजनक! फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार! Saam TV
महाराष्ट्र

संतापजनक! फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

कोणाला सांगितलं तर "तुझ्या भावाला खल्लास करून टाकीन" अशी धमकी पिडीत मुलीला देण्यात आली आहे.

विनोद जिरे

बीड: पासपोर्ट फोटो काढण्यासाठी फोटो स्टुडिओमध्ये गेलेल्या, एका अल्पवयीन मुलीवर फोटो स्टुडिओमध्येचं अत्याचार करण्यात आला असून जर हे कोणाला सांगितलं तर "तुझ्या भावाला खल्लास करून टाकीन" अशी धमकी देण्यात आली. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या (Beed) धारूर शहरांमध्ये घडली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पिडितेच्या फिर्यादीवरून ती धारूर शहरातील, नरसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली होती. यादरम्यान आरोपी फोटो चालक मधूर बालासाहेब फरतडे याने, पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता पीडित अल्पवयीन मुलीला दुसर्‍यादिवशी देतो म्हणाला. यादरम्यान दुसऱ्या दिवशी पीडिता ही, नरसिंह फोटो स्टुडिओ येथे आली असता, आरोपी फरताडे याने तिच्यावर अत्याचार केला. सदरील प्रकार कोणास सांगितल्यास "मी तुझ्या भावाला खल्लास करेल" अशी धमकी दिली.

तर दुसरा आरोपी सहदेव चाळक याने, काही दिवसांनी पीडितेवर फोटो स्टुडिओमध्येचं अत्याचार केला.दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून, आरोपी मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक दोन्ही रा. धारुर यांच्यावर कलम 376, 504 भादवि व कलम 4,5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान घटनेने जिल्ह्यात खळबळ उडालीय.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुढच्या वर्षी लागणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून राडा, भाजप आमदारांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून फेकल्या, VIDEO

NCP Symbol Hearing : पुढील ३६ तासांत... पक्ष आणि घड्याळ चिन्हावरून सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतच मुंबईकरांना शब्द; लाडकी बहीण, धनुष्यबाण चिन्ह, टोलमाफीवरही सर्व काही बोलले!

Relationship Tips: ब्रेकअप का होतो? ही आहेत प्रमुख कारणे

SCROLL FOR NEXT