यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस; दोघे गेले वाहून, एकाचा मृत्यू! संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस; दोघे गेले वाहून, एकाचा मृत्यू!

वणी तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (वय 40), बालू उईके (वय 40), हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: वणी Wani तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश देठे (वय 40), बालू उईके (वय 40), हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून वाहून गेले आहेत. सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. रात्रभर दोघांचाही शोध सुरू होता. अखेर सतिश देठे यांचा सकाळी गावालगत मृतदेह Death Body आढळून आला. तर बालू उईके यांचा शोध सुरु आहे. सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता.

हे देखील पहा-

नाल्याला पुर आल्याने सतीश देठे आणि बालू उईके यांनी दुचाकी Two Wheeler नाल्याच्या बाजूला लावली. आणि त्यांनी पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या Flood पाण्यात ते दोघेही वाहून गेले.

मृत सतिश देठे व बेपत्ता असलेले बालू उईके हे दोघेही शेती करत. सोमवारी ता. 30 ऑगस्ट रोजी कामानिमित्त ते दुचाकीने राजूर Rajur येथे गेले होते. रात्री 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास ते परत येत होते. सोमवारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सोनापूर नाल्याला पूर आला होता. हा पुल सखल भागात असल्याने मुसळधार पाऊस Heavy Rain झाल्यास पुलावरून सुमारे 3 ते 4 फुट पाणी वाहत असते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT