Petrol Updates  Saam Tv
महाराष्ट्र

नाशिककरांनो, आजच पुरेसं पेट्रोल-डिझेल भरून घ्या! नाहीतर... (पहा Video)

नाशिककरांनो तुमच्या गाडीत आजच पुरेसं पेट्रोल, डिझेल भरून घ्या नाहीतर ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पेट्रोलअभावी गाडी ढकलण्याची वेळ तुमच्यावर येईल.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: नाशिककरांनो तुमच्या गाडीत आजच पुरेसं पेट्रोल, डिझेल भरून घ्या नाहीतर ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पेट्रोलअभावी गाडी ढकलण्याची वेळ तुमच्यावर येईल. कारण आज मध्यरात्री 12 वाजेपासून 2 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. (Latest Nashik News)

नाशकात पेट्रोल पंप बंदची हाक का?

नाशकात 2 एप्रिलपासून हेल्मेटसक्तीचा पुढचा टप्पा सुरू होत असून यामध्ये दुचाकीवरील दोघांना हेल्मेट घालणं अनिवार्य करण्यात आलंय. त्याचबरोबर पेट्रोल पंपावर विना हेल्मेट दुचाकीचालकाला पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंप चालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या गुन्हा दाखल करण्याच्या या निर्णयाविरोधात पेट्रोल पंप चालक आक्रमक झाले असून पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाच्या निषेधार्थ पेट्रोल पंप चालकांनी एक दिवसीय बंदची हाक दिलीय. त्यामुळे 1 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपासून ते 2 एप्रिलच्या रात्री 12 पर्यंत ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. (Nashik Petrol News)

पहा व्हिडीओ-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: जवळच्या व्यक्तीपासून राहा सावध, ५ राशींना होणार धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

Iran-US War: अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं? युद्धविरामाची इनसाईड स्टोरी

Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

SCROLL FOR NEXT