A tragic incident in Yavatmal where a toddler lost his life after receiving an electric shock from a water cooler. saam tv
महाराष्ट्र

तुम्ही कूलर वापरताय? सावधान ! कूलरनं घेतला चिमुकल्याचा बळी

Cooler Electric Shock Kills Toddler Yavatmal: सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय आणि या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी प्रत्येक घरात कूलरचा वापर केला जातोय. पण तुम्ही वापरत असलेला हाच कूलर तुमच्या जीवावर बेतू शकतो. यवतमाळमधून अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आलीये. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यानं गरमीपासून सुटका करण्यासाठी तुम्ही जर कूलर वापरत असाल तर सावधान... आम्ही असं का म्हणतोय....यासाठी तुम्ही ही बातमी एकदा पाहा... ज्या कुलरचा वापर तुम्ही उकाड्यापासून सुटका करण्यासाठी करताय... त्याच कुलरमुळे एका चिमुकल्याचा बळी गेलाय... होय... यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील शिरोलीत कुलरमध्ये आलेल्या विजेचा धक्का लागून अवघ्या 14 महिन्यांच्या स्वराजचा जीव गेलाय...

त्याचं झालं असं की सकाळच्या वेळी स्वराजची आई अंगणात सडा-सारवण करण्यात व्यस्त होती. आणि याचदरम्यान अंगणात खेळत असलेल्या स्वराजने कुतूहलापोटी कुलरच्या पाण्याच्या टाकीत हात टाकला. त्यामुळे त्याला शॉक लागला. पालकांनी स्वराजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी स्वराजला मृत घोषित केलं. आई आणि वडील

यापूर्वीही कूलरनं अनेकांचे बळी घेतले आहेत. त्या घटनांवर एक नजर टाकूयात...

गारवा देणारा कूलर उठला जीवावर

29 एप्रिल 2024

हिंगोलीत कूलर शॉक लागल्यानं 14 वर्षांच्या लेकराचा मृत्यू

6 मे 2024

अकोल्यात कूलरचा शॉक लागून 7 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

5 मे 2025

अकोल्यात कूलरचा शॉक लागून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

15 जून 2025

अमरावतीत कूलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

या घटनेमुळे कूलरबाबत लहानग्यांच्या आई-वडिलांमध्ये दहशत पसरलीय. कारण उन्हाळा असल्यामुळे ग्रामीण भागात बहुतांश घरांमध्ये कुलरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे कूलर वापरताना तुमच्या घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या आणि त्यांची काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT