या अहवालामध्ये मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होते अशी शिफारस असण्याची शक्यता आहे
तसेच आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला जाण्याची शक्यता
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस आयोग या अहवालातून करण्याची शक्यता आहे
आयोगाची शिफारस राज्य सरकार स्वीकारू मराठा आरक्षणासाठी बोलवलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा संमत करण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्र आणि पक्ष निकाल यावर शरद पवार गटाचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ
घटनेच्या दहाव्या शेड्युल चे कोणतेही निकष या ठिकाणी लावले नाहीत
कुणालाही अपात्र केले नसल्याने मध्यम स्वरूपाच्या निकाल आहे
निकाल अपेक्षित होता,मात्र आम्हाला न्याय मिळेल असेही वाटले होते
अनेक घटना चुकीच्या मांडल्या गेल्या,ज्या बैठका झाल्याचं माहीत त्या सांगितल्या गेल्या
सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल हीच अपेक्षा
अजून चिन्हाचा निर्णय नाही मात्र आमचा चिन्ह शरद पवार आहे
त्यांना बघितल्यावर लोकांना समजते
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन एक दिवसाऐवजी दोन दिवसाचे होणार
20 आणि 21 फेब्रुवारीला होणार अधिवेशन
20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव
तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार
विधिमंडळ सूत्रांची माहिती
आपदार अपात्रता निकालावर अद्याप आपल्याकडे माहिती आली नाही, अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं
पक्षाच्या निर्णय क्षमतेत प्रत्येक सदस्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे
त्याचा अर्थ त्या सदस्याने अधिसूची १० चे उल्लंघन केले असा होत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व सदस्य त्यांच्या ठिकाणी काम करत आहेत या प्रकरणात दहाव्या सूचीचा अर्थ पक्षाचे सदस्य सोडल्याप्रमाणे वापरता येणार नाही
माझ्या मते लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पक्षातील बेशिस्तीसाठी शेड्युल्ड १०चा वापर करता येणार नाही
अजित पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल
विविध राज्यातील अशा प्रकरणातील दाखले पाहता विधीमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली व सरकार पडलं तर त्या पक्षाविरुद्ध कार्यवाही होत नाही कारण त्या पक्षास पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी असते. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणीही अपात्र नाही
शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या
नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत
पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही
अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे
त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही
प्रत्येक गटाच बहुमत महत्वाचं आहे
अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा होता
शरद पवार गटाने 41 आमदारां विरोधात अपात्र याचिका दखल केली
निवडणूक झाल्याचे दिसून येत नाही आहे
विधिमंडळ बहुमत आता इथे ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही
एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे
त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत
मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही
नेतृत्व रचना, पक्षीय घटना व विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल
यामध्ये पक्षीय घटना व नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही
शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल
राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे
दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत
तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत
30 जुन नुसार अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून निवड केली
अजित पवार हे अध्यक्ष होतात
तरी अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही
29 जुन पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आक्षेप घेटला न्हवता
30 जुन रोजी शरद पवार पार्टी अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन क्लेम करण्यात आले
दोन्ही पार्टीने राष्ट्रवादी घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत असा दावा केला आहे
कोणत्या पार्टीचा पक्ष खरा आहे हा मुद्दा दोन्ही पक्षांबदल सारखा आहे
शरद पवार गटाकडून एकही आमदार उपस्थित नाही
केवळ एक वकील उपस्थित
पार्टीची घटना आणि बहुमत असल्यास पक्ष त्या पार्टीचा होतो
दोन्ही पार्टीने पार्टीच्या घटनेवर विश्वास दर्शवला आहे
30 जुन रोजी 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानलं
30 जुन रोजी दोन गट पडले होते
त्यामुळे अधिकृत तारीख ही 30 जुन मानली जात आहे
उल्लासनगरला आमदाराने गोळीबार केला आणि त्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला. पोलिस ठाण्यात गोळीबार होण्याची ही पहिली घटना आहे
दहिसरला फेसबुक लाईव्ह सुरू 4असताना गोळीबार करण्यात केला याचं काय कारण होतं अजुन काही समोर आलं नाहीं
गुंड मंत्रालयात रीलस बनवत आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर गुंडांचे फोटो व्हायरल होतं आहेत
आता आमची मागणी आहे की गेटवर कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवून मंत्रालयात प्रवेश मिळायला हवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा राजीनामा
मुरलीधर जाधव यांनी दिला शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा
जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवला प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा
काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव यांची केली होती जिल्हाप्रमुख पदावरून हकलपट्टी
नाराज झालेल्या मुरलीधर जाधवांनी दिला अखेर शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा
यावेळी भरपूर भारतरत्न वाटली गेली… आता आपण एक मागणी करुया…
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न मिळालच पाहिजे
शरद पवारांसह सगळ्यांनी हात वर करुन या मागणीला समर्थन दिलं
दिल्लीवाले महाराष्ट्राचा द्वेष करतात… ते आपल्यात भांडण लावतात
राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, अद्ृश्य शक्ती राज्य चालवते
निखिल वाघळे यांच्यावर हल्ला कराणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे
भक्ती कुंभार या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता होती. त्यांचा चालक हा साहेबांचा कार्यकर्ता
राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एन्ट्री
पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज
परंतु राज्यसभेचा अर्ज भरताना 10 आमदरांच्या लागतात सह्या
त्यामुळे हा अर्ज छाणनीमध्ये टिकेल का? हा प्रश्नचिन्ह
पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न...
पारनेर येथील हॉटेल दिग्विजय जवळील घटना
सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली घटना
आरोपी अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती
आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस चौकशी सुरू
उद्यापासून लोणावळ्यात सुरू होणार काँग्रेस चे २ दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काँग्रेससाठी हे शिबिर महत्त्वाचे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उद्या पुणे दौऱ्यावर असून ते देखील या शिबिराला उपस्थितीत राहणार
उद्या संध्याकाळी पार पडणार विधानसभा व विधान परिषद सदस्यांची बैठक
पुणे-नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास वाघोलीतील कटकेवाडीजवळ ट्रॅव्हल्स बसला भीषण आग
आगीत बस पूर्णपणे जळून खाक, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही
घटना पेट्रोल पंपसमोर घडल्याने मोठी दुर्घटना टळली
हिंगोली : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जाळला पुतळा
नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर कोपरखैरणे येथे उड्डाणपुलावर ट्रक पलटी
ठाणे-बेलापूर मार्गावर वाशीकडे येणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी
ट्रकला JCB च्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरु
ठाणे-बेलापूर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
वाहतूक उड्डाणपुलाखालून वळवली
पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला केली मारहाण
येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं पठाण असं नाव
अधिकारी गंभीर जखमी तर येरवडा कारागृहात गोंधळ
पोलीस घटनास्थळी दाखल
धाराशिवमध्ये घराबाहेर झोपलेल्या शेतकऱ्यावर अज्ञात चोरट्याने केला धारदार शस्त्राने हल्ला
धाराशिवच्या परंडा शहरातील करमाळा रोडवरील काशीमबाग येथील वस्तीवरील घटना
चोरट्यांनी ऊसतोड कामगारांच्या कोपीचा कपडा कापुन मोबाईलही केला चोरी
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला बार्शी येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात केले दाखल
रामा अभिमान भानवसे (माळी) असं हल्ला झालेल्या शेतकऱ्याचं नाव
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची पुण्याला बदली
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारीपदी दिलीप स्वामी यांची नियुक्ती
गेल्या काही दिवसापासून आस्तिक कुमार पांडे हे प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले होते
मनपा आयुक्तांकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता
स्वामी हे यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते
अशोक चव्हाण समर्थक तीन आमदार आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुउपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
मोहन हंबर्डे, जितेश अंतापुरकर, माधवराव पाटील जवळगावकर हे आमदार अनुपस्थित राहू शकतात
काँग्रेसच्या बैठकीला ६ ते ७ आमदार राहणार अनुपस्थित
अनपस्थित आमदारांनी पक्ष श्रेष्टींकडे न येण्याची कारणं दिल्याची माहिती
बैठकिला कारणं न देता अनउपस्थित राहणार्यांवर पक्षाची राहणार नजर
मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेवर आक्षेप
सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सुट्टी न देता परीक्षा ठेवल्याने आक्षेप
सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारी रोजीचा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेना हा पेपर बंद पाडण्याचा इशारा
सीबीएसई बोर्डाने 2024 इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे
19 फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या वेळापत्रकात संस्कृत या विषयाचा पेपर घेण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन मनसे तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे
नाशिक जिल्ह्यातील धरणे फेब्रुवारीच्या मध्यातच आटू लागली
जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा ४९ टक्क्यांवर
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील १६ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा
तर नाग्यासाक्या धरण कोरडं ठाक, शून्य टक्के पाणीसाठा
आगामी काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हं
नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यात 4029 शेतकऱ्यांचे नुकसान
3734 हेक्टरवरील शेत पिकांना फटका बसल्याची प्राथमिक सर्वेक्षणात आकडेवारी आली समोर
10 आणि 11 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात झाला होता अवकाळी पासून आणि गारपीट
कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED सहावं समन्स
19 फेब्रुवारीला चौकशीला हजर राहण्याचा समन्समध्ये उल्लेख
यापूर्वी आलेल्या एकही समन्सला केजरीवाल हजर राहिले नव्हते
केजरीवाल यांनी ED वर आरोप करत मला रोखण्यासाठी भाजप हे सगळं करत असल्याचा आरोप केला होता
तर केजरीवाल यांच्या विरोधात ED ने कोर्टात धाव घेतली होती तेव्हा कोर्टाने केजरीवाल यांना 17 तारखेला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत
जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी
16 फेब्रुवारीच्या वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेणार
पोस्टरमधून संदेश द्यायचा प्रयत्न
पुणे महानगरपालिकेला मिळणार 800 कोटी रुपयांचा निधी
अमृत 2 योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या विविध योजनांना केंद्र सरकारकडून मिळणार निधी
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.