Surabhi Jayashree Jagdish
रोज रात्री अनेक वेळा लघवीला जावं लागत असेल, तर ही बाब सामान्य नाही. अनेकांना वाटतं की हे वय वाढल्यामुळे, प्रोस्टेट किंवा कमजोर ब्लॅडरमुळे होतं. मात्र प्रसिद्ध डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, प्रत्येकवेळी हीच कारणं असणं गरजेचं नाही.
रात्री एकदा लघवीसाठी उठणं सामान्य आहे. पण जर रोज आपण दोनपेक्षा जास्त वेळा लघवीला जात असाल, तर ही बाब धोकादायक असू शकते.
रात्री वारंवार लघवी लागण्याचं एक मोठं कारण अँटी-डाययूरेटिक हार्मोन आहे. हे हार्मोन रात्री लघवीचं प्रमाण नियंत्रित करतात. जर हे नीट काम करत नसतील, तर रात्री जास्त लघवी तयार होते.
अँटी-डाययूरेटिक हार्मोन योग्यरित्या काम न करण्यामागे काही कारणं असतात. शरीरात जास्त मीठ आणि कमी पोटॅशिअम असणं, ब्लड शुगर वाढणं, संध्याकाळी जास्त पाणी पिणं ही कारणं असू शकतात.
पाय किंवा टाचांवर सूज राहत असेल तर याचा अर्थ शरीरात पाणी जमा झालं आहे. रात्री झोपल्यावर हे पाणी रक्तात परत जातं आणि मग किडनीच्या माध्यमातून लघवी तयार होऊन बाहेर पडतं.
झोपण्याच्या दोन तास आधी पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे संध्याकाळी अल्कोहोल किंवा कॅफीन घेऊ नये, रात्री स्नॅक्स खाऊ नयेत, गोड, मसालेदार किंवा जास्त प्रोटीन टाळावं आणि रात्री हलकं जेवण करावं.
रात्री वारंवार लघवी लागणं ही नेहमीच ब्लॅडरची समस्या नसते. याचा अर्थ शरीरात काही समस्या असण्याचीही शक्यताही असते. मात्र समस्या अधिक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.