maharashtra  Saam Tv
महाराष्ट्र

Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरली असली तरी गारठा कायम आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असून अनेक भागांत पहाटे धुके आणि रात्री तीव्र थंडी जाणवत आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात थंडीची लाट ओसरली तरी गारठा कायम

  • किमान तापमानात चढ-उतार होत असून काही ठिकाणी दहाच्या खाली नोंद

  • उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा परिणाम वाढतो आहे

  • पुढील काही दिवस सकाळी धुके आणि रात्री कुडकुडणारी थंडी कायम राहणार

उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या लहरी मंदावल्या असून थंडीची लाट ओसरलेली पाहायला मिळते आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात गारठा कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, काही ठिकाणी पहाटे धुके पाहायला मिळत आहे. आज राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची, तसेच थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीचा लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. बुधवारी धुळे येथे ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, निफाड आणि जेऊर येथे ८ अंश, तर परभणी आणि गोंदिया येथे ९ अंशांपेक्षा कमी, अहिल्यानगर, मालेगाव, ‎नागपूर, भंडारा, ‎यवतमाळ येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत, थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच २२ डिसेंबरपर्यंत किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार असून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांपर्यंत राहील. सकाळी धुके आणि रात्री कुडकुडणारी थंडी राहील. दुपारची वेळ मात्र उबदार राहण्याची शक्यता आहे. १९, २१ आणि २२ डिसेंबरला थंडीची तीव्रता जास्त राहण्याचे संकेत आहे.

या काळात किमान तापमानात आणखी काही अंशी घट होऊ शकते. महासागरातील थंड पाण्यामुळे उत्तर भारतातून कोरडे उत्तर-पश्चिम वारे दक्षिणेकडे सरकू लागले आहेत. यामुळे रेडिएटिव्ह कूलिंग रात्रीची थंड होण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे. परिणामी धुक्याचे प्रमाण वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत असल्यामुळे असल्याने थंडी तीव्र होत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT