Bhandara News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News : मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिला उमेदवाराने लढवली अनोखी शक्कल, १०० रुपयांच्या स्टॅंप पेपरवर दिली आश्वासने

मतदाराला आकर्षित करण्यासाठी त्यांनी चक्क आपला जाहिरनामा १०० रूपयांच्या स्टॅंम्प पेपरवर लिहून दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.आता या निवडणुकीत मतदाराला आकर्षित करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला असून एका महिला सरपंच पदाच्या उमेदवाराने चक्क आपला जाहिरनामा 100 रूपयांच्या स्टॅंम्प पेपरवर लिहून दिला आहे तोही नोटरी करून. (Latest Marathi News)

अश्या शासकीयरित्या अधिकृत करून दिलेल्या या जाहिरनामाच्या चर्चा सद्धा जिल्ह्यात जोरदार सुरु आहे. छबु वंजारी असे या महिला उमेदवाराचे नाव आहे. त्या पवनी तालुक्यातील सोमनाळा गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत. बी एस्सी,एम एस डब्लू असे त्यांचे शिक्षण आहे.

येत्या १८ डिसेंबरला होणाऱ्या ८ सदस्यीय (७+१) सोमनाळा ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात त्यांनी ही उडी घेतली आहे. गावात स्थानिक पातळीवरील दिग्गज स्थानिक नेते असतांना आपन निवडणुकीत उभे असल्याने १२०० लोकसंख्या (Population) असलेल्या मतदाराला आकर्षित करण्यासाठी त्यांनी चक्क आपला जाहिरनामा १०० रूपयांच्या स्टॅंम्प पेपरवर लिहून दिला आहे.

इतकेच नाही तर त्यांनी चक्क त्याला नोटरी करत शासकीय अधिकृतता मिळवून दिली आहे. दोन पाणी लिहिलेला जाहिरनामा आपण निवडून आल्यास आपल्याला बंधनकारक असणार असल्याचे उमेदवारी बाई सांगत फिरत आहेत. लोक मतदाराच्या मतांवर निवडून येतात. निवडणुकीआधी सर्वच उमेदवार विकास कामाची आश्वासने देतात. मात्र नंतर त्यांना याचा विसर पडतो. मतदार उमेदवाराकडून नाराज असल्याने मतदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आपन हे केल्याचे वंजारी बाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा जाहिरनामा केवळ आपल्याला नाही तर आपल्या पूर्ण पॅनलला असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गावातिल ग्रामस्ताला हा असा नोटरी केलेला जाहिरनामा आकर्षित करत असून पहिल्यांदा असा जाहिरनामा पहिल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे निवडणूक (Election) प्रचाराचे बदलते स्वरूपाचे कौतुक गावकरी करीत आहेत.

मतदाराला आर्कषित करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही.असाच प्रयत्न छबु वंजारी यांनीही केला आहे. मात्र निवडून आल्यावर त्यांना आपल्याच जाहिरनामाच्या विसर पडल्यास हा नोटरी केलेला जाहिरनामा त्यांच्याच अंगलट येऊ नये इतकेच बरे. असेही मत काही गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT