ravi rana
ravi rana 
महाराष्ट्र

निर्दोष मुक्तता हाेताच भाजप आमदारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

अरुण जोशी

अमरावती : दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे सरकारने द्यावे अन्यथा येणारी दिवाळी मातोश्रीवर साजरी होऊ देणार नाही. शेतक-यांच्या हितासाठी प्रसंगी मातोश्री समाेर आंदोलन छेडू असा इशारा आमदार रवी राणा ravi rana यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. रस्ता राेकाे आंदाेलन केल्याप्रकरणातून तिवसा न्यायालयाने आज (मंगळवार) आमदार राणांसह सर्व शेतक-यांची निर्दाेष मुक्तता केली. त्यावेळी आमदार राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. tivasa-court-released-mla-ravi-rana-25-farmers-amravati-breaking-news

मागील वर्षीच्या दिवाळीला बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा पोलिसांनी आमदार रवी राणांसह कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले हाेते.

आज (मंगळवार) या प्रकरणाची सुनावणी न्यायधिश श्री. कोरडे यांच्या समाेर झाली. यावेळी तिवसा न्यायालयात राणा समर्थक उपस्थित हाेते. न्यायालयाने आमदार राणांसह सर्वांची निर्दोष मुक्तता केली. यावेळी राणा यांचे वतीने ऍड. आशिष लांडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात आमदार रवी राणा व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना uddhav thackeray इशारा दिला आहे. ते म्हणाले दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे राज्य सरकारने त्वरित द्यावेत. अन्यथा येणारी दिवाळी मातोश्रीवर साजरी होऊ देणार नाही. आम्ही मातोश्रीवर आंदोलन करू.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Dharashiv Lok Sabha Votting Live: लातूरच्या औसा येथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, ४५ मिनिटांपासून मतदान थांबले

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT