kolhapur news  saam tv
महाराष्ट्र

Tiranga Rally: भारत माता की जय! इचलकरंजी दणाणली, अडीच किलोमीटर तिरंगा रॅली, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे, याच पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.

Omkar Sonawane

पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्कराचे कौतुक करीत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस इचलकरजीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतमाता की जय...! पाकिस्तान मुर्दाबाद यांसह देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तरला सलाम करण्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात आयोजित तिरंगा रॅली उपक्रम इचलकरंजीमध्ये ही राबवण्यात आला. तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, हातात राष्ट्रध्वज घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तान विरुध्द तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत आणि भारतीय सैन्यदलाचे प्रोत्साहन वाढवत वस्त्रनगरी इचलकरंजीत शनिवारी भव्य अशी ‘तिरंगा एकता रॅली’ काढण्यात आली.

या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोच्या संख्येने सामुहिक सलामी देण्यात आली. काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आंतकवादी हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकचे कुटील मनसुबे धुळीस मिळवले. भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनिय असून या जवानांचे मनोबल वाढविणे हे आपले कर्तव्य असल्याने इचलकरंजीत ‘तिरंगा एकता रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीस पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज व परिधान केलेल्या तिरंगी टोप्या यामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता.

रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुभेदार जयपाल कोरेगांवे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, अहमद मुजावर, सौ. अलका स्वामी, सौ. मौशमी आवाडे, मिश्रीलाल जाजू, विजय भोजे, श्रीरंग खवरे, अनिल डाळ्या, धोंडीराम जावळे आदींसह मान्यवर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT