TTE saves toddlers life by giving him CPR on train 
महाराष्ट्र

चालत्या ट्रेनमध्ये बाळाचा श्वास थांबला; देवदूत बनून धावला टीसी

Siddharth Latkar

सातारा : पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या एका दाेन वर्षांच्या बाळाचे चालत्या ट्रेनमध्ये हृदयाचे ठोके थांबल्याने डब्यात खळबळ उडाली. पालकांना समजत नव्हते की काय करावे? मग देवदूत म्हणून आलेल्या तिकीट निरीक्षकाने (टीसी) वेळेवर सीपीआर देऊन बाळाचे प्राण वाचवले TTE saves toddlers life by giving him CPR on train. बाळाचा परतलेला श्वास पाहून पालकांच्या जीवात जीव आला. ही घटना गाेंदिया- काेल्हापूर एक्सप्रेस जी महाराष्ट्र एक्सप्रेस Maharashtra Express म्हणून परिचित आहे यामध्ये नुकतीच घडली.

हुंडेकरी कुटुंबिय सांगलीला एका कार्यक्रमासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत हाेते. कोल्हापूरच्या दिशेने धावणा-या रेल्वेत त्यांच्या बाळाची तब्येत ठणठणीत होती. लाेणंद साेडल्यानंतर वाठार स्टेशननजीक बाळाची तब्येत बिघडली. त्याचा श्वास थांबला, त्याचे डोळे पिवळे झाले. हे पाहून कुटुंबाचे हात पाय गळाले. डब्यातील इतर प्रवासीही गाेंधळले. काेणाला काय मदत करावी हे सूचनेनासा झाले. पालकांनी तर हंबरडाच फाेडला.

एस फाईव्ह डब्यातील गाेंधळ वाढला. या डब्यात तिकीट निरीक्षक राजेंद्र काटकर TTE Rajendra Katkar आले. त्यांनी हा क्षण पाहताच ते मदतीसाठी पुढे धावले. त्यांना मुलाला तोंडातून सुमारे १० ते १५ मिनिटे श्वास दिला (सीपीआर). त्यानंतरही मुलाच्या प्रकृतीत थाेडीशी सुधारणा झाली. सुमारे १५ मिनिटांनंतर काटकर यांची मेहनतीस यश आले बाळ रडू लागले. हे पाहून डब्यातील प्रत्येकजण आनंदी झाला. टाळ्या वाजवू लागले. पालकांच्या डाेळ्यातून अश्रु आेघळले.

राजेंद्र एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी सातारा Satara रेल्वे स्थानकावर बाळासाठी रुग्णवाहिका मागवली. त्याच्या कुटुंबाला रुग्णवाहिकेतून रवाना केले. बाळाला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर दोन तास उपाचर करण्यात आले. या उपचारानंतर त्याची प्रकृती व्यवस्थित झाल्याने नातेवाईकांनी डिस्चार्ज घेतला.

रेल्वे प्रशासनामुळे आमच्या बाळाचे आराेग्य ठणठणीत झाले. विशेषतः टीसीने केलेली मदत आमच्यासाठी माेलाची ठरली असे बाळाचे नातेवाईक इम्पतीयाज हुंडेकरी यांनी नमूद केले.

एस फाईव्ह डब्यात गाेंधळ सुरु हाेता. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी मी एस सेव्हनमधून तेथे गेलाे. पाहताे तर काय एक बाळ निपचित पडले हाेते. त्याला सीपीआर दिला. ते काही वेळानंतर रडू लागले. ते पाहून आनंद तर झालाच मात्र रेल्वे प्रशासनास कळवून साता-याला त्यांना पुढील उपचारासाठी पाठवून दिले. खरंतर मी स्काऊट असल्याने मला प्रथाेमपचाराची first aid पद्धत माहित असल्याने हे घडले असे तिकीट निरिक्षक (टीसी) राजेंद्र काटकर यांनी नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT