Navi Mumbai: नवी मुंबईच्या वाशी येथे थायरोकेअरची सर्वात मोठी लॅब आहे. या कंपनीचे संस्थापक आणि आणि एमडी ए वेलुमन सध्या आपल्या कंपनीतून ७००० कोटींची कमाई करतात. मात्र बक्कळ पैसा आणि श्रीमंत असलेल्या वेलुमन यांचा सुरुवातीचा काळ फार खडतर होता. आपल्या व्यवसायात घवघवीत यश मिळवण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. आज या बातमीतून वेलुमन यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
वेलुमन यांच्या घरची परिस्थिती फार हालाखीची होती. दोन वेळचे जेवणही त्यांना फार मुश्कीलने मिळत होते. त्यांच्या आईला काम केल्यावर आठवड्याला ५० रुपये मिळायचे. अशा परिस्थितीत वेलुमन यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते बीएआरसी नोकरीला लागले. या काळात त्यांची परिस्थिती छान सुधाराली. लग्न झाल्यावर पत्नी आणि मुलांसह त्यांचं सुंदर आयुष्य सुरु होतं. मात्र काही दिवसांनी त्यांच्या नोकरीत मोठा अडथळा आला.
वेलुमन यांच्या एका चुकीमुळे ऑफीसमधील बॉस त्यांना ओरडले. वेलुमन यांना या गोष्टीचा फार राग आला. त्यांनी तात्काळ आपल्या नोकरीला लाथ मारली. नोकरीवर राजिनामा देत ते घरी निघाले. पुढे काय होणार काय नाही. याची त्यांना काहीच कल्पना नव्हाती. मात्र तरी देखील ते आपल्या नर्णयावर ठाम राहिले. त्यांच्या या निर्णयात पत्नीने त्यांना मोठी साथ दिली.
दिवसाचा खर्च ५ रुपये
पुढे वेलुमन आपला स्वताचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले. यावेळी त्यांच्याकडे विज्ञान क्षेत्रातील एक डिग्री आणि खिशात ५०० रुपये होते. रोज ५ रुपये खर्चायचे या हिशोबाने त्यांनी १०० दिवसांसाठी ५०० रुपये आणले होते. या काळात त्यांना फार त्रास सहन करावा लागला. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी त्यांच्या पायात साधी चप्पल देखील नव्हती. आज वेलुमन कोट्यावधींचे मालक झाले आहेत. मात्र आपले जुने दिवस ते अद्याप विसरले नाहीत. आजही ते सामान्य माणसांप्रमाने राहतात आणि विशेष म्हणजे लोकल ट्रेनमधून देखील प्रवास करतात.
कमी किंमतीत चांगली सेवा
सुरुवातीच्या काळात व्यवसाय सुरु करण्यासाठी वेलुमन यांनी थायरॉइड टेस्टींगच्या मशीन भाड्याने विकत घेतल्या होत्या. या मशिनचा वापर करत त्यांनी ६०० रुपयांना मिळणारी सुविधा १०० रुपयांत देण्यास सुरुवात केली. अतीशय कमी किंमतीत उत्तम सेवा मिळत असल्याने लाखो नागरिक या कंपनीकडे आकर्षित झाले. या व्यवसायात वेलुमन यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे. त्यांनी आपली एसबीआय मधील नोकरी सोडून पतीला कामात मदत केली. वेलुमन यांची ही कहाणी सर्वच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.