Pune Fire Saam tv
महाराष्ट्र

Pune Fire: पुण्यात मंडपाच्या गोदामाला भीषण आग; घटनेत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील वाघोली, उबाळे नगर येथील गोदामाला काल रात्री उशिरा आग लागली.

Prachee kulkarni

Pune News: पुण्यात एका गोदामाला आग लागल्याचं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील वाघोली, उबाळे नगर येथील गोदामाला काल रात्री उशिरा आग लागली. गोदामाला लागलेल्या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पुणे (Pune) महापालिकेच्या हद्दीतील वाघोळी, उबाळे नगर येथील 'शुभ सजावट' या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली. या गोदामाला काल रात्री ११.४३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेत ४ सिलिंडर फुटल्याने मोठा अनर्थ घडला.

आग लागल्याची माहिती मिळताच पुणे ५ व पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने व जवान यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तसेच दुर्देवाने घटनास्थळी ३ कामगारांचे मृतदेह आढळले आहेत.

आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोदामाकडे जवानांनी खबरदारी घेत आग पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आग

पिंपरी चिंचवडमध्येही आग लागल्याची घटना घडली. पिंपरी-चिंचवडमध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाला आग लागल्याची घटना घडली. ही आग रात्री उशिरा रात्री दोन वाजण्याच्या सुमारासआग लागल्याची घटना घडली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे २ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये कागदपत्रे जळून खाक झाली असून लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT