nagar kalyan accident news saam tv
महाराष्ट्र

Nagar Kalyan Highway Accident News : तिहेरी अपघातात तीन ठार, सहा जखमी; पारनेर पाेलिस घटनास्थळी दाखल

या अपघातामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली हाेती.

Siddharth Latkar

Nagar Accident News : नगर कल्याण महामार्गावरील (nagar kalyan highway) धोत्रे येथे तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातस्थळी आज सकाळपासून अपघातग्रस्त वाहनं पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

नगर कल्याण महामार्गावर टेम्पो आणि दोन कार या तीन वाहनांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण हाेती की दाेन्ही कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

घटनास्थळी पारनेर पोलीस दाखल झाले आहेत. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच सहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान या अपघातामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

IND vs AUS : कुलदीप-हर्षितचा पत्ता कट, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूही संघाबाहेर, पाहा प्लेईंग ११

नवी मुंबईत सुसाट प्रवास, मुंबई-पुणे महामार्ग फक्त १० मिनिटांत; २,९०० कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील, कसा असेल ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे?

Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन

Relationship Issues: पत्नी असूनही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात का पडतात? वाचा पुरुषांच्या मनातील रहस्य

SCROLL FOR NEXT