three injured in truck two wheller accident at pavani near bhandara  saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News : पवनीमध्ये ट्रक दुचाकी अपघातात तिघे जखमी; दुचाकीस्वार भंडारा रुग्णालयात दाखल

Siddharth Latkar

- शुभम देशमुख / राेहिदास गाडगे

Bhandara :

भंडारा जिल्हयातील पवनी शहरात ट्रक दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात (pavani accident) एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेतील अन्य दाेघा जखमींना उपचारार्थ भंडारा जिल्हा रुग्णालयात (bhandara hospital) दाखल करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघाताबद्दल घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : भिवापुरहून येणाऱ्या एका ट्रकने नागपूर सावजी भोजनालायसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार हवेत उडाला.

अपघातग्रस्त ट्रक दुकानात शिरला तर त्यात दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडल्याने ताे गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त जखमी लोमेश्वर श्रीराम ठाकरे (वय ५०, राहणार भिवापूर) असल्याची माहिती भंडारा जिल्हा रुग्णालयातून मिळाली.

नारायणगाव : सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्टलसह अटक

नारायणगाव परिसरात विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. पवन थोरात (police arrests pavan thorat in narayangaon) असे अटक केलेल्याचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान खेड, आंबेगाव जुन्नर, शिरुर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी टोळक्यांजवळ गावठी पिस्टल बाळगण्याचे प्रमाण आहे. याकडे कारवाई कधी होणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : बेपत्ता १६ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबियांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या, गंभीर आरोप!

Maharashtra News Live Updates: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

DRDO Job: परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; डीआरडीओ निघाली भरती, पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Shocking News: विमानात सुरु होते अश्लील चाळे.. जोडप्याला फ्लाईटमधून बाहेर काढलं; न्यायालयानेही ठोठावली ३०० तास...

Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने अख्ख्या गावाला विषबाधा; तब्बल 300 नागरिक रुग्णालयात दाखल, नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT