accident, Mumbai-Pune Expressway, Mumbai-Pune Expressway Accident saam tv
महाराष्ट्र

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; ट्रकचा चक्काचूर, नागपूरच्या बस चालकासह तिघे जखमी

रविवारी रात्री झाला भीषण अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai-Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि बस अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास झाला. या अपघातामधील जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Pune Expressway Accident News)

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी - रविवारी रात्री मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि बसमध्ये विचित्र अपघात (accident) झाला. पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक विरुद्ध बाजुकडे पुणे लेनवर आला. (Maharashtra News)

यावेळी समोरुन येणाऱ्या खाजगी आराम बसला या ट्रकने धडक दिली. बसला जोरदार धडक देत ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चक्काचुर झाला तर बसचे देखील मोठे नुकसान झाले. बस चालकाने बस वेळीच शोल्डर लेनवर (राखीव लेन) नेल्याने आणि दरम्यान एक्सप्रेस वेवर वाहतुक कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

या अपघातामध्ये ट्रक चालक नावेद खान (नागपूर) आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचाराकरिता एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीने दिली पुणे महापालिकेची जबाबदारी

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Municipal Corporation Elections: महापालिकेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT