Satara Accident Saam TV
महाराष्ट्र

Satara Accident : फलटणजवळ कारचा भीषण अपघात; ३ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, ३ गंभीर जखमी

सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ भरधाव स्विफ्ट डिझायर कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. फलटण ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी

Satara Accident Death News : हॉटेलमध्ये जेवण करून हॉस्टेलकडे परतत जाताना झालेल्या अपघातात ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात फलटण तालुक्यातील वाठारनिंबाळकर हद्दीत झाल. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व तरुण हॉटेलमध्ये जेवण उरकून कारने (स्विफ्ट डिझायर) हॉस्टेलकडे परतत होते. वाठारनिंबाळकर हद्दीत आले असता, चालक मोहम्मद हुसेन याचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीच्या कठड्याला जोरदार धडकून पलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला.

या अपघातात चालक मोहम्मद हुसेन (वय - मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर नयन लोंगाणी, सौरभ कुमार आणि एम.डी. मितारे हे तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. जखमींवर सध्या फलटण आणि बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, फलटण ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia seeds benefits: दूध की पाणी? चिया सिड्स कशात भिजवून खाल्ल्यास मिळतील फायदे?

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Eye Twitching : डोळे सतत फडफडतात? शुभ-अशुभ नव्हे, शरीर देतेय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Baramati News: 'सोमवेश्वर' निवडणुकीत जय पवारांचा करिश्मा, २१ -० ने विजय; शरद पवार गटाचा दारूण पराभव

ट्रक-मोटारसायकलची समोरासमोर धडक; जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमध्ये हळहळ

SCROLL FOR NEXT