Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

वीज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

मृतांमध्ये एका महिलेसह एका 22 वर्षाच्या तरुणाचा व एका 48 वर्षीय व्यक्तीचा ही समोवेश आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना - जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर वीज कोसळून एका महिलेसह दोन जणांचा दुर्दवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहे. मृतांमध्ये एका महिलेसह एका 22 वर्षाच्या तरुणाचा व एका 48 वर्षीय व्यक्तीचा ही समोवेश आहे.

55 वर्षीय गंगाबाई जाधव असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून त्या कोदा शिवारातील रहिवासी आहे. तर या महिलेसोबत असणारे दोन जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हे देखील पाहा -

तर मंठा तालुक्यातील पेवा गावात वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या अनिल शिंदे या 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.तर तिसऱ्या घटनेत मंठा तालुक्यातील माळकीनी गावात ही वसंत जाधव या 48 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा गावात ही येथील रेणुका देवी मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा घुमट कोसळला आहे. या मुळे मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट हुन वीज कोसळून दुर्दैवी मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Winter Fashion: हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या टिप्स नक्की फॉलो करा, मिळेल ट्रेंडी आणि ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल

Olya Naralache Vade: जेवणाला पुऱ्याच कशाला? बनवा पांरपांरिक पद्धतीने कुरकुरीत ओल्या नारळाचे वडे

SCROLL FOR NEXT