Chhatrapati Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Crime News : लाईफ एन्जॉय करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून बनले बाईक चोर, तीन आरोपींना बेड्या

Chhatrapati Sambhajinagar : चोरीच्या दुचाकींना ग्राहक शोधत असताना आरोपी गुन्हेशाखा पोलिसांच्या हाती लागले.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar : आय़ुष्यात श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी अहोरात्र मेहनत अनेकजण करताना दिसतात. मात्र झटपट कमाई करण्यासाठी चौघांनी नियमित कामधंदा सोडून छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनचोरी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे.

घाटी रुग्णालय परिसरात आणि एमजीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींनी केलेली बाईक चोरी कैद झाली आहे. मात्र चोरीच्या दुचाकींना ग्राहक शोधत असताना आरोपी गुन्हेशाखा पोलिसांच्या हाती लागले. (Latest Marathi News)

आरोपींची नावं

संतोष कदम, राहुल देशमुख आणि दिलीप लंबे अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपी हे वाळूज एमआयडीसीतील खाजगी कंपन्यामध्ये कामाला जात होते. मात्र मुख्य आरोपी कदम याने अन्य आरोपींना झटपट दुचाकी कशी चोरून दहा हजार रुपये एका वाहनामागे कमवण्याचे आमिष दाखवले. (Crime News)

आरोपीच्या सांगण्याप्रमाणे इतर तिघेही त्याच्यासोबत दुचाकी चोरी करू लागले. या तिघांनी मौजमजा करण्यासाठी विविध भागातून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. मात्र ग्राहक न मिळाल्याने सहा वाहने लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाखांच्या आठ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT