Accident Saam TV
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात एका तासाच्या कालावधीत तीन अपघात...

या तीन अपघातात प्रत्येक ठिकाणी 1 असे तीन जण जागीच ठार झाले आहेत.

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात रात्री सात ते आठ या एका तासाच्या दरम्यान, विविध ठिकाणी 3 अपघात झाले आहेत. या तीन अपघातात (Accident) प्रत्येक ठिकाणी 1 असे तीन जण जागीच ठार झाले आहेत. अपघातात शिवसेनेच्या बीड (Beed) उप तालुका प्रमुखाचा समावेश आहे.

बीडहुन गावी लिंबागणेशकडे दुचाकी वरून जात असतांना, दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये शिवसेनेचे (Shivsena) तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे वय 40 यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बीड - सोलापुर महामार्गावरील पाली जवळ रात्री साडेसातच्या दरम्यान झाला आहे.

हे देखील पहा -

तर दुसरा आणि तिसरा अपघात बीड - परळी महामार्गावरील भोपा गावालगत, दोन ट्रॅक्टरच्यामध्ये बुलेट दुचाकी येऊन, शेख शकील शेख दगडू वय 29 रा.भोपा हा तरुण चिरडून ठार झाला झाला आहे. तर सदरील अपघातामुळे जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. आणि याच वाहतूक कोंडीमुळं तिसरा अपघात झाला. ट्राफीकमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकवर दुचाकी धडकली. या झालेल्या अपघात गणेश राजेभाऊ मुंडे वय 27 रा. कोठरबन ता. वडवणी हा तरुण जागीच ठार झाला. हे दोन्ही अपघात रात्री पावणेआठ ते 8 च्या दरम्यान झाले आहेत.

दरम्यान हे तीनही अपघात केवळ एक तासाच्या कालावधीत झाले असून या अपघातात तरुण वयातील व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्याने, जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणि दिंद्रुड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT