Delhi School 
महाराष्ट्र

Delhi School: 30 हजार डॉलर द्या, नाहीतर ४० शाळांना उडवतो, दिल्लीमध्ये धमकीचा फोन

Delhi School: डीपीएस, आरके पुरम शाळेला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूललाही धमकी देण्यात आली.

Dhanshri Shintre

दिल्लीतील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. दोन शाळांना धमकीचे ईमेल आले आहेत. डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूलला बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. बॉम्बच्या धमकीनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे.

आता या वेळी धमकी पाठवणारा कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, आतापर्यंत या धमकीचा मेल पाठवण्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. दिल्लीतील दोन आणि देशभरातील ४० शाळांना उडवण्याची सीआरपीएफ शाळांना त्यानंतर ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.

बॉम्बच्या धमकीनंतर पोलिसांचे पथक आणि अग्निशमन विभाग दोन्ही शाळांमध्ये पोहोचून बॉम्बचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात शाळांमध्ये काहीही संशयास्पद सापडलेले नाही. याआधीही दिल्लीतील अनेक शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. जे नंतर बनावट असल्याचे सिद्ध झाले.

दरम्यान, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी परत पाठवले आहे, तर पोलीस आणि अग्निशमन विभागालाही सकाळी सात वाजता कळवण्यात आले. याआधीही अनेकवेळा दिल्लीतील शाळा, विमानतळ, हॉटेल आणि इतर ठिकाणी बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या आल्या आहेत. जे तपासात खोटे ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

SCROLL FOR NEXT