shegaon, guru purnima 2023 saam tv
महाराष्ट्र

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, शेगावात भाविकांची अलाेट गर्दी, साईमंदिर रात्रभर खुले राहणार

Siddharth Latkar

- संजय जाधव / सचिन बनसाेडे

Guru Purnima 2023 Celebrations : आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त शेगावत संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. शेगाव बराेबरच शिर्डीत देखील भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

गुरुपौर्णिमा निमित्त शेगावत संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या दाखल झाले आहेत. गुरु पौर्णिमेनिमित्त आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन सुद्धा करण्यात आल आहे. आज सकाळपासूनच शेगावच्या मंदिर परिसरात भाविकांचा माेठा उत्साह पाहायला मिळत आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्तांनी शिर्डीत (shirdi) अलोट गर्दी केली आहे. दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. आज भाविकांना दर्शनासाठी साईमंदिर रात्रभर खुले राहणार आहे.

साई समाधी मंदिरासह साईबाबांच्या गुरुस्थान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी साई भक्तांमध्ये उत्साह दिसून येतोय. याच ठिकाणी असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली साईबाबा नेहमी बसत. हे त्यांच्या गुरूंचे स्थान आल्याचे साई बाबांनी सांगितल्याचा उल्लेख साई चरित्रात आढळतो. त्यामुळे साई भक्तांसाठी गुरुस्थान मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे अशी माहिती शिर्डी येथील साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT