हे सरकार पाच वर्षे टिकणार- बच्चू कडू Saam Tv
महाराष्ट्र

हे सरकार पाच वर्षे टिकणार- बच्चू कडू

हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे, असा आत्मविश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झाला आहे. याबाबत सत्ताधारी महाआघाडीतील नेते आणि विरोधातील नेते वेगवेगळे बोलत आहे. This government will last for five years- Bachchu Kadu

परंतु, हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे, असा आत्मविश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज व्यक्त केला. भाजपमधील काही लोकांना भाजपमध्ये ठेवायचे असल्याने त्यांना ते स्टेटमेंट द्यावेच लागते असा टोला पालकमंत्री कडू यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

हे देखील पहा -

ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते. त्यांना राज्यातील सरकार आणि राजकीय घडामोडी संदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले, बरेच लोक म्हणतात की हे सरकार टिकणार नाही. पण, याला काही अर्थ नाही. भाजपमधील काही लोकांना भाजपमध्येच ठेवायचे असल्याने त्यांना ते स्टेटमेंट द्यावेच लागते.

असं कोणी सांगणार आहे का की सरकार पाच वर्षे चालणार आणि आम्ही विरोधातच राहणार, असे सांगूच शकणार नाही. ते सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. अन सांगितलं तर भाजपला किती गळती होईल हे पण सांगता येत नाही. त्यामुळे किमान फुटू नये, यासाठी हा अपप्रचार चालू असते, असे ही ते म्हणाले.

सरकारला काही अस्थिरता येणार नाही. मला वाटतं अतिशय चांगलं काम विरोधक म्हणून त्यांनी आणि सत्ताधारी म्हणून आम्ही केलं पाहिजे. शेवटी लोकांच्या मनात आपल्या कर्तृत्वाने कसे उतरता येईल, ते पाहणे महत्वाचे आहे, असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

प्रताप सरनाईक यांचे पत्र आहे की बॉम्ब आहे, हे संशोधन करण्याची गरज आहे. प्रताप सरनाईक हे अतिशय खंदे शिवसैनिक आहेत. ते चांगले काम करतात. हे पत्र लिहून त्यांना नेमके काय समोर आणायचे आहे, हे अजूनही निश्चित होत नाही. त्याच्या मागचा उद्देश काय आहे, हे समजत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला पाहिजे, असे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT