Satara News, Satara Water Supply, Kass Lake Water Supply saam tv
महाराष्ट्र

Satara News : सातारकरांसाठी गुड न्यूज, आजपासून पाणी कपात रद्द; 'हे' चार दिवस कास, शहापूरच्या पुरवठ्यावर परिणाम

पालिकेने कास योजनेवरील देखील पाणी कपात मागे घेतली आहे.

Siddharth Latkar

Satara News : सातारा पालिकेच्या पाणीपूरवठा विभागाने (satara water supply news) कास आणि शहापूर योजनेतील जाणवणा-या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आजपासून (साेमवार) विविध कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे शहरात कास आणि शहापूर याेजनेच्या पाणी पूरवठ्यावर परिणाम हाेणार असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली आहे. (Maharashtra News)

मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी दिलेल्या पत्रकात शहापूर योजनेच्‍या उच्‍चदाब वाहिनीची दुरुस्‍ती, तसेच कास योजनेच्‍या सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण टाकीच्‍या स्‍वच्‍छतेची कामे हाती घेण्‍यात येणार आहे. या कारणास्‍तव शहापूर योजनेचा पाणीपुरवठा २१ आणि २२ जूनला तसेच कास योजनेतील पाणीपुरवठा १९ (साेमवार) आणि २० जून कमी अथवा खंडित होऊ शकतो असे म्हटलं आहे.

शहापूर योजनेवरील यशवंत टाकीच्‍या माध्‍यमातून दुपारच्‍या सत्रात होणारा पाणीपुरवठा २१ आणि २२ जूनला सकाळच्‍या सत्रातील गुरुवार, गणेश, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा, बुधवार नाका टाकीच्‍या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने अथवा खंडित होण्‍याची शक्‍यता आहे. आजपासून (साेमवार) पाणीकपात देखील पालिकेच्‍या वतीने मागे घेण्‍यात येणार आहे असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

कास (Kass) योजनेच्‍या सांबरवाडी टाकीतील फिल्‍टर बेडचे काम १९ जूनला पालिकेच्‍या वतीने करण्‍यात येणार आहे. यामुळे १९ जूनला सकाळच्‍या सत्रातील डोंगराळ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

२० जूनला यादोगोपाळ, मंगळवार पेठेतील तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्‍यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्‍‍वर टाकीच्‍या माध्‍यमातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पालिकेने कास योजनेवरील देखील पाणी कपात सोमवारपासून मागे घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT