Narendra Modi/Nitin Gadkari SaamTV
महाराष्ट्र

मला कधी कधी वाटतं नरेंद्र मोदी आणि गडकरींमध्ये स्पर्धा तर नाही ना? - भगतसिंग कोश्यारी

'शरद पवार आणि नितीन गडकरी संपूर्ण देशाचे चमकते तारे आहेत.'

अभिजीत सोनावणे

नगर : आज राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (Mahatma Phule Agricultural University) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले यावेळी भाषणात बोलताना राज्यपालांनी पवार आणि गडकरींचे तोंडभरुन कौतुक केले. तर गडकरी आणि मोदींमध्ये काही स्पर्धा तर सुरु नाही ना असं म्हणाले.

तसेच आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले 'शरद पवार आणि नितीन गडकरी संपूर्ण देशाचे चमकते तारे आहेत. (Sharad Pawar And Nitin Gadakari) या दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांनी कृषी विद्यापीठाचं कामकाज कौतुकास्पद असून शरद पवारांच शेती आणि सहकारातील योगदान महत्वाचं आहेच तसेच गडकरींच देखील इतर क्षेत्रासह शेती क्षेत्रात चांगलं काम करत असल्याच ते म्हणाले.

मोदी गडकरी स्पर्धा तर नाही? -

"नितीन गडकरींनी यांनी कधी कधी शरद पवारांकडे जायला हवं पवार यांच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे. गडकरींच्या मनात रोज नवनवीन आणि वेगळे विचार कुठून येतात, काही कळत नाही मला कधी कधी वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गडकरी यांच्यांत स्पर्धा तर नाही सुरू? रोज नवीन कल्पना आणतात दोघांचे कार्य प्रेरणादायी आहे." असही राज्यपाल म्हणाले.

मी उत्तराखंडमधील जनतेस सांगतो महाराष्ट्राकडे बघा -

मराठी Marathi ही मातृभाषा, मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा सर्व महाविद्यालयांनी मराठीचा वापर करावा तसेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेतीत चांगली प्रगती केली आहे. मी उत्तराखंडमधील जनतेस सांगतो महाराष्ट्राकडे बघा शेती क्षेत्रातील संशोधन आणि पेटंटसाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत उत्तम खेती, मध्यम काम, निकृष्ट चाकरी, असं म्हटलं जायचं कोविड संकटात फक्त शेती सुरू होती, देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी टिकवली असल्याचे शेतकऱ्याबद्दल गौरवोद्गार देखील कोश्यारी यांनी काढले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT