नागपूर : नागपुरात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी आज हनुमान चालिसाचे पठण केलं. यावेळी राष्ट्रवादीकडूनही महागाई विरोधात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. पोलिसांनी (Police) नागपूर शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. नागपुरात येताच राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. नागपुरातील हनुमान चालीसा पठणावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली. (Devendra Fadnvis Latest News)
'राणा दाम्पत्य नागपुरात आल्यावर काय घटना घडली, याची मला कल्पना नाही. मात्र, देशात, राज्यात, नागपुरात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही. पण याला जर कुणी विरोध करीत असेल तर ते अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राणा दाम्पत्याच्या आजच्या नागपूर भेटीसंदर्भात दिली. आज देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागपुरात खासदार नवनीत राणा बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहे, अशी टीका राणा यांनी केली. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले. यावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांनी विचारले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, कुणी कोणाला काय म्हणाले, याच्याशी माझं काही देणंघेणं नाही. मात्र सर्वांनी योग्य भाषा वापरली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
'सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर टीका करताना सरकार मसनात जाईल, असं म्हटले गेले. त्यावर फडणवीसांनी उपरोधिक टोला लगावला. राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक अक्षरही बोलले, तर पाच-दहा जेल ठिकाणी जेलमध्ये जावे लागेल. असा चुकीचा पायंडा या सरकारने पाडला आहे, असंही फडणवीस म्हणाले.
हनुमान चालिसा पठणाला आधी शिवसेनेने (Shivsena) विरोध केला. आता राष्ट्रवादी विरोध करते आहे, काँग्रेस म्हणते आम्हाला यात रस नाही, त्यावर त्यांना काय म्हणायचे मी त्यावर काही बोलणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.