अनिल परबांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; किरीट सोमय्यांची हायकोर्टात याचिका

रिसॉर्ट विभास साठे यांनी परब यांना गिफ्ट म्हणून मोफत दिला आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit SomaiyaSaam Tv

मुंबई: दोन दिवसापूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची (ED) धाड पडली होती. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते. या धाडीवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील ते रिसॉर्ट अनिल परब यांचेच असल्याचा दावा केला होता. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली.

'अनिल परब (Anil Parab) यांच्या घोटाळ्याची सीबीआय (CBI) चौकशी व्हायला हवी अशी याचिका मी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला याचा पुरावा परब यांनी स्वत: दिला. आयकर विभागाला परब यांनी दिलेल्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे, असंही सोमय्या म्हणाले.

Anil Parab, Kirit Somaiya
Navneet Rana : माविआ सरकारने इंधनावरील दर कमी करावे - नवनीत राणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर हा रिसॉर्ट परब यांनी स्वत:च्या नावावर करून घेतला. हा रिसॉर्ट विभास साठे यांनी परब यांना गिफ्ट म्हणून मोफत दिला आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.

अनिल परब (Anil Parab) यांनी जिथे रिसॉर्ट उभारला आहे तो नॉन डेव्हलपमेंट परिसर आहे. ही जागा अहवालात खाडोखोड करुन नावावर केली. २०२१ मध्ये चौकशीत ही बाब समोर आल्यानंतर परवानगी दिलेल्या संबधित अधिकाऱ्यावर कारवाई केली. यावेळी सोमय्या यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना सवाल केला. ' तुम्ही दुसऱ्यांना पर्यावरणाचा सल्ला देता. पण तुमचे मंत्रीच कायदा पायदळी तुडवत आहेत, असा सवाल सोमय्या यांनी केला.

Anil Parab, Kirit Somaiya
IIIT च्या ५ विद्यार्थ्यांनी रचला इतिहास; बड्या कंपन्यांकडून १ कोटींपेक्षा जास्त पॅकेज

अनिल परबांना उद्धव ठाकरे मदत करत आहेत

आम्ही या अगोदर दापोलीतील पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. पण दापोलीतील पोलीस अस काही झालंच नसल्याचे म्हणत आहेत. म्हणून आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे. आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत सर्व तपास यंत्रणा चौकशीची मागणी केली आहे. अनिल परब म्हणतात माझा रिसोर्टशी काही संबध नाही मात्र निवडणूक प्रतिज्ञा पत्रात विभास साठेला १ कोटी दिल्याचे लिहिले आहे, असंही सोमय्या म्हणाले.

देशात ज्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लोकांचा मृत्यू होत होते तेव्हा अनिल परब दापोलीत मोठे रिसॉर्ट बांधल होते, परब यांना वाचवण्यासाठी स्वत: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मदत करत आहेत, असा आरोपही सोमय्या (Kirit Somaiya)यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com