जालना Crime News : जालन्यातील चुर्मापुरी येथे मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठल रुख्मिणी मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातील सोन्याचे दोन मुकुटासह दानपेटीतील दोन लाखांची रोख रक्कम चाेरली आहे.
चोरीस गेलेल्या मुकुटांची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याची प्राथमिक उपलब्ध झाली आहे. चोरी करणारे दोन जण सीसीटीव्हीत कॅमेरात दिसत आहेत. हे चाेरटे दुचाकीवरून जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी गावकऱ्यांनी गोंदी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.