theft saam tv
महाराष्ट्र

Crime News: तहसीलदारांच्या बंगल्यासह ७ दुकानांत चाेरी

व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : वैभववाडीत (vaibhavwadi) चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत सात दुकानांसह (shop) दोन घरे (house) फोडली आहेत. यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (sindhudurg latest marathi news)

शनिवारी पहाटेच्या सुमारास वैभववाडी बाजारपेठेसह करूळ परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकूण सात दुकानांसह दोन बंद घरे फोडली. यात रजेवर असलेल्या वैभववाडी तहसीलदारांच्या (vaibhavwadi tashildar) शासकीय बंगल्यास देखील चाेरट्यांनी लक्ष केले.

या घटनेत चोरट्यांनी केवळ एका दुकानातील रोकड तर एका घरातून सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास केले. संशयीत चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या घटनेत टोळीचा सहभाग उघड झाला आहे. पोलीस (police) ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर बाजारपेठेत घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT