धक्कादायक : रेती माफियांनी घरात घुसून पाजलं तरुणाला विष; तरुणाची प्रकृती गंभीर Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक : रेती माफियांनी घरात घुसून पाजलं तरुणाला विष; तरुणाची प्रकृती गंभीर

सुरज गजानन पांडे असं पीडीत युवकाच नाव असून या युवकावर खामगाव सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : आपल्या घरासमोर होत असलेल्या रेती वाहतुकीमुळे घरामध्ये धुळ येत होती आणि ती धुळ येतेय म्हणून एका युवकाने रेती वाहतुकीला विरोध केल्याने रेती माफियांनी त्या युवकाच्या घरात घुसूनच त्याला विष पाजल्य़ाची धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव येथील आहे.

सुरज गजानन पांडे असं पीडीत युवकाच नाव असून या युवकावर खामगाव सामान्य रुग्णालयात अतिदक्षता (ICU) विभागात उपचार सुरु आहेत. 'घरात धुळ जाते म्हणून माझ्या घरासमोरून रेती वाहतूक करू नका', असं सुरजने रेती वाहतुक करणाऱ्यांना सांगितलं होतं याचाच राग आल्याने गोळेगाव येथील तिघांनी सुरजच्या घरातमध्ये घुसून त्याला विष पाजलं

दरम्यान या प्रकारबाबत युवकाच्या भावाच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेती माफिया बाळकृष्ण नाईक, पुंडलिक गोळे ,रतन नाईक यांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न करणे IPC 307,35या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Shukra Yuti: 5 वर्षांनंतर एकत्र येणार बुध-शुक्र; दोन्ही ग्रहांच्या युतीनंतर 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Viral Video : धावत्या स्कुटीवर विजेचा खांब पडता पडता राहिला, महिला थोडक्यात बचावली, घटना CCTV मध्ये कैद

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

SCROLL FOR NEXT