लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणाला भिंत फोडून बाहेर काढले गोपाल मोटघरे
महाराष्ट्र

लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणाला भिंत फोडून बाहेर काढले

लिफ्टमध्ये अडकलेल्या एका पेपर वितरक तरुणाला भिंत फोडून बाहेर काढुन त्याचा जीव वाचवीण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : लिफ्टमध्ये अडकलेल्या एका पेपर वितरक तरुणाला भिंत फोडून बाहेर काढण्यात यश आल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. तरुणाच्या ह्या सुटकेचा थरार पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरातल्या साईनगरी सोसायटीत घडला आहे. सुमित आळसे नामक 17 वर्षीय तरुण साई नगरी सोसायटीत नेहमीप्रमाणे सकाळी वर्तमानपत्र वितरण करत होता. त्यावेळी एका लिफ्ट मध्ये प्रवेश करून तो सातव्या मजल्यापर्यंत पोहचला.

हे देखील पहा -

मात्र, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. अचानक लिफ्ट बंद पडल्याने सुमित घाबरला, मात्र प्रसंगाधान राखत त्याने लिफ्टमधील अलार्म बटन दाबले व वर्तमानपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष हेमंत तांबे यांना काॅल केला. आणि तांबे आल्यानंतर अडकलेल्या सुमितला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले मात्र, सगळे प्रयत्न असफल ठरू लागल्याने. शेवटी अग्निशमन विभागाच्या रेस्क्यू टीमने ब्रेकरने भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भिंत फोडून सुमितला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सुमितच्या सुटकेचा हा थरार सुमारे 2 ते अडीच तास सुरू होता. त्या दरम्यान सोसायटीतील इतर सदस्यांनी त्याला पाणी आणि बिस्कीट ही खायला दिले आणि सोसायटी चे चेयरमन निलेश गीते यांनी भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मात्र हा प्रकार मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडण्यासारखा होता. कारण लिफ्ट मध्ये अडकलेल्या तरुणाला पुरेसा श्वास घेण्यासाठी हवा मिळाली नसती तर प्रसंगी त्याच्या जीवावर बेतले असते.

लिफ्ट अचानक बंद पडण्याचे प्रकार अलीकडे अनेक सोयासिटी मध्ये घडतात, त्यामुळे नव्या नियमांप्रमाणे यापुढे लिफ्टला काच किंवा सेफ्टी बसवणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरीकांडकून केली जातीय त्याच बरोबर लिफ्ट बसविणाऱ्या संबधित कंपन्यांवरही दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याची बाब या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : मनमाड शहरात मोठा राडा, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

Wedding Varat Ritual: लग्नानंतर नवरा आणि नवरीची वरात का काढतात?

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

SCROLL FOR NEXT