मित्राचा खून करून मृतदेहाचे तुकडे टाकले कुपनलीकेत !
मित्राचा खून करून मृतदेहाचे तुकडे टाकले कुपनलीकेत !विजय पाटील

मित्राचा खून करून मृतदेहाचे तुकडे टाकले कुपनलीकेत!

पार्टी सुरु असताना मित्राला सिगारेट आणायला पाठवले मात्र त्याला सिगारेट आणायला उशीर झाल्याने संतापलेल्या दोन्ही आरोपींनी मित्रावर कोयत्याने वर करून त्याचा निर्घुण खून केला.
Published on

सांगली : पार्टी सुरू असताना दत्तात्रय झांबरे या युवकाला आरोपींनी सिगारेट आणायला पाठवले. सिगरेट आणण्यासाठी वेळ लागल्याने संतापलेल्या दोन्ही आरोपींनी त्याच्या अंगावर कोयता घेऊन सपासप वार करून डोक्यात दगड घालून खून करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे कुपणालिकेत टाकले. अमोल खामकर व सागर सावंत अशी आरोपींची नावे असून मित्रांनीच क्रौर्याची परिसीमा गाठल्याची ही धक्कादायक घटना सांगलीच्या मिरज मधील भोसे या गावात उघडकीस आली आहे.

हे देखील पहा -

मिरज तालुक्यातील भोसे येथील दत्ता झांबरे हा युवक गावातून गायब होता. त्याचा शोध घेऊन  29 जुलै रोजी त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अमोल खामकर, सागर सावंत हे दत्ताचे चांगले मित्र होते. 28 जुलै रोजी हे तिघेही एकत्र असताना त्या दिवसापासून दत्ता गायब असल्याचे त्याच्या घरातल्यांच्या लक्षात आले होते. दत्ता हा गाव सोडून गावा बाहेर जात नसल्याने आणि त्याच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांना  घातपाताचा संशय बळावला.

मित्राचा खून करून मृतदेहाचे तुकडे टाकले कुपनलीकेत !
मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणण्याची ई-मेलवरून धमकी

पोलिसांना तपासादरम्यान खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दत्ताचा खून झाला आहे. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत या प्रकारणाचा छडा लावला आणि त्याच्याच जवळच्याच मित्रांनी हा खून केले असल्याचे निष्पन्न झाले. 28 जुलै रोजी अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांनीच दत्ता झांबरेचा दारू पिल्यानंतर शिवीगाळ केल्याचा मनात राग धरून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. भोसे येथील बंद अवस्थेत असलेल्या कंपनीमध्ये निर्जनस्थळी दत्ताला मारून टाकण्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या मृतदेहचे तुकडे करून कुपनलिकेत टाकल्याचे दोघांनी कबुली केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com