Heart Attack Saam Tv
महाराष्ट्र

Heart Attack : मनगटावरील 'घड्याळ' देणार हार्ट अटॅकचा 'अलार्म'; 230 रुग्णांवर यशस्वी प्रयोग

Lifestyle News : नागपुरातील डॉक्टर शंतनू सेनगुप्ता यांचं संशोधन

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

Nagpur News : मनगटातील घड्याळ आता तुम्हाला हार्ट अटॅकचा अलार्म देणार आहे. नागपुरातील वरिष्ठ हृदयारोगतज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी हे घड्याळ तयार केलं आहे. 230 रुग्णांवर त्यांनी यशस्वी प्रयोगही केले आहेत. नुकतंच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी याचे सादरीकरणही केलं आहे. (Latest Marathi News)

हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याच्या रुग्णांमध्ये ‘ट्रोपोनिन’ पातळीचे विश्लेषण करण्यासाठी सध्या रक्त तपासणी हाच एक पर्याय आहे. मात्र त्यात बराच वेळ जातो. मनगटावर घालता येणाऱ्या घड्याळासारख्या उपकरणाच्या माध्यमातून जर हृदयगती, ई.सी.जी. सुद्धा काढता येत असेल, तर ‘ट्रोपोनिन’ पातळीची माहिती का नाही, या विचारावर डॉ. सेनगुप्ता यांनी संशोधन सुरू केले. (Nagpur Latest News)

असेच एक उपकरण अमेरिकेतील (America) एका फर्मकडून बनवून घेतले. या उपकरणाची चाचणी मागील वर्षभर पाच मोठ्या दवाखान्यांमध्ये सुरू होती. याचे ‘रिपोर्टस’ थेट अमेरिकेत कंपनीला जात होते. रक्त तपासणी आणि या उपकरणाच्या माध्यमातून केलेली तपासणी यांचे निकाल ९८ टक्के जुळले. यामुळे आता लवकरच ‘ट्रोपोनिन’ची पातळी शोधण्यासाठी आवश्यक असलेली रक्त तपासणी ही कालबाह्य होईल आणि काही वर्षांतच हे उपकरण त्याची जागा घेईल.

डॉ. सेनगुप्ता यांनी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत या घड्याळाचे सादरीकरण केल्यानंतर युरोपमध्येही याचे स्वागत होत आहे. प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांना अनुसरून उपकरणाची स्टेज फोर चाचणी यशस्वी झाली की, याचे व्यावसायिक उत्पादन सुरू होणार आहे.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनगटात परिधान केलेले हे उपकरण ट्रोपोनिन पातळीचे विश्लेषण करीत असल्याने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रक्त तपासणीसाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचेल. रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील. रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nevasa Exit Poll: मानखुर्द मतदारसंघात कोण विजयी होणार? संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची जादू पुन्हा चालणार का? एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll: श्रीवर्धनचा गड आदिती तटकरे राखणार? VIDEO

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT