प्रसूती रजेवर असणाऱ्या महिलेचही केलं निलंबन; ST महामंडळाचा अजब कारभार ! SaamTV
महाराष्ट्र

प्रसूती रजेवर असणाऱ्या महिलेचही केलं निलंबन; ST महामंडळाचा अजब कारभार !

सारिका कोद्रे-लाड (Sarika Kodre-Lad) या लातूर डेपोमध्ये महिला वाहक म्हणून गेल्या 16 वर्षांपासून सेवा बजावीत आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज करीत प्रसूती रजा (Maternity leave) दिली होती.

दिपक क्षीरसागर

लातूर : एसटी कर्मचारी आंदोलनातून (ST Staff) माघार घेत नसल्याने आता महामंडळाने कारवाईचा बडगा उचलला असून यामध्ये त्यांनी आंदोलकांविरोधात गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत निलबंनाची कारवाई सुरु केली आहे. आत्तापर्यंत जवळपास 9000 कर्मचाऱ्यांच निलंबन देखील केलं आहे. मात्र लातूर तालुक्यातील मुरुड इथे राहणाऱ्या सारिका कोद्रे-लाड (Sarika Kodre-Lad) या लातूर डेपोमध्ये महिला वाहक म्हणून गेल्या 16 वर्षांपासून सेवा बजावीत आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज करीत प्रसूती रजा (Maternity leave) दिली होती. तरीदेखील त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (The woman who was on maternity leave was also suspended)

हे देखील पहा -

सारिका कोद्रे-लाड यांची 25 दिवसापूर्वी डिलिव्हरीही झाली आहे. मात्र गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने (ST Corporation) त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे स्वतः सारिका कोद्रे यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

प्रसूती रजा दिल्यानंतरही अशा पद्धतीचे निलंबनाचे आदेश ज्यांनी काढले आहेत त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी वाहक सारिका कोद्रे यांनी केली आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांने आणि कशा पद्धतीने माझ्यावरती कारवाई केली आहे ते महामंडळाने सांगाव आणि माझ्यावरती चुकीची कारवाई करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवरती त्वरीत कारवाई करावी असही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT