Weather Forecast Today
Weather Forecast Today Saam Tv
महाराष्ट्र

पुण्यासह 'या' जिल्ह्यांत आज मेघगर्जना; हवामान खात्याचा अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यात पुढील ५ दिवसांमध्ये तीव्र हवामान सक्रिय राहणार आहे, असा इशारा भारतीय हवामान (Weather) खात्याने दिला आहे. तर पुणे (Pune) जिल्ह्यात आज पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या (Marathwada) भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हे देखील पाहा-

यावेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणच्या (Konkan) किनारपट्टीवर, अरबी समुद्रावर मध्यम प्रकारचे ढग आहेत. सकाळी मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले होते. पुढील ५ दिवसांत राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगड, पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवार आणि मंगळवार असे २ दिवस, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार, कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी तर बीड- परभणीमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या काळात वाऱ्यांचा वेग देखील जास्त प्रमाणात असू शकणार आहे. अकोला, बुलडाणा येथे मंगळवार ते गुरुवार तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Today's Marathi News Live: एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात ठाण मांडलं तरी जनता महाविकास आघाडीसोबत; आदित्य ठाकरे

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

Morning Tips : सकाळच्या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर; आज अवलंबा...

SCROLL FOR NEXT