The water of Dev river in Akkalkuwa of Nandurbar infiltrated the school दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar : देव नदीचे पाणी शाळेत शिरले; विद्यार्थ्यांचे दोरीच्या साहाय्याने रेस्क्यू

Flood In Nandurbar : वडफळी गावात असलेल्या शासकीय आश्रम शाळेच्या परिसरात देव नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील (Nandurbar) दुर्गम भागात असलेल्या कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडफळी गावात असलेल्या शासकीय आश्रम शाळेच्या परिसरात देव नदीच्या पुराचे पाणी (Flood Water) शिरले आहे. त्यामुळे शाळेत असलेल्या मुलांना दोरीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी काढण्याचे काम सुरू आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासापासून संततधार सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. (Flood In Akkalkuva, Nandurbar News)

याठिकाणी राहणारे भगवान तडवी, भोगू तडवी आणि चापडी पाड्यावर राहणारे गमीर नाईक यांच्या घरात नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने घरगुती सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी आणि छोटे नाले भरून शेतांमध्ये जलमय परिस्थिती झाली असून वस्तींमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या या गावातील नागरिकांना प्रशासनाने जलमय परिस्थितीचा आढावा घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

SCROLL FOR NEXT