नागपुरात बावनकुळेंचा विजय निश्चित; निकालाची अधिकृत घोषणा बाकी  Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात बावनकुळेंचा विजय निश्चित; निकालाची अधिकृत घोषणा बाकी

नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होत आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होत आहे. बावनकुळे यांचा विजयाचा कोटा पूर्ण झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत निश्चित आहे. चंद्रशेखर बावनकुळे याना ३६२, तर मंगेश देशमुख याना १८६ मत मिळाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरमध्ये (Nagpur) बावनकुळे याचा विजय निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा राहिली आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन मध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे.

हे देखील पहा-

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार टेबलवर ही मतमोजणी पार पडत आहे. चार अधिकारी ही सर्व मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. साधारणतः दुपारी 10 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे आहे. कारण या निवडणुकीमध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ट्विस्ट आला होता. काँग्रेसने आपला उमेदवार बदलवत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता.

त्यामुळे रंगतदार लढत झाली. त्यामुळे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे बाजी मारणार की काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे (BJP) चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) अशी थेट लढत होणार होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने उमेदवार बदलला.

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचा (Congress) उमेदवार कोण याबाबत मतदार शेवटपर्यंत संभ्रमात होते. देशमुख आणि भोयर यांच्यामध्ये काँग्रेसचे मतविभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा बावनकुळे यांना होण्याची शक्यता आहे. रिंगणात तीनच उमेदवार असल्याने निकालाबाबत चुरस आणखीच वाढली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

SCROLL FOR NEXT