एसटी कर्मचारी संघटनेकडून संप मागे; मात्र आझाद मैदानातील कर्मचारी ठाम Saam Tv
महाराष्ट्र

एसटी कर्मचारी संघटनेकडून संप मागे; मात्र आझाद मैदानातील कर्मचारी ठाम

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकार मधील विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य आर्थिक मुद्यांवर एसटी महामंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्यावर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा सोमवारी रात्री करण्यात आली. कर्मचाऱ्यांना (employees) कामावर रूजू होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

त्यामुळे येत्या २ दिवसामध्ये राज्यातील (state) एसटीची (ST) सेवा पूर्ववत होईल, अशी आशा एसटी महामंडळाला असली तरी कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. आम्ही संपातून माघार घेणार नाही, असे आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतल्यानंतर किती कर्मचारी कामावर रूजू होणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील पहा-

एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्याकरिता संपाची नोटीस (Notice) देणाऱ्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी मंत्रालयात (ministry) बैठक करण्यात आली.

या बैठकीच्या चर्चेनंतर कर्मचारी संघटना संपातून माघार घेत असल्याची घोषणा गुजर यांनी यावेळी केली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर न्यायालयाने (court) नेमलेली त्रिसदस्यीय समिती जो निर्णय देमार आहे. तो एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात येणार आहे, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची एसटी कर्मचारी संघटनेची मागणी होती. त्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

संपकरी कर्मचाऱ्यांची बडतर्फी आणि निलंबनासह अन्य कारवाया मागे घेण्याची मागणी देखील या बैठकीमध्ये कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली. त्यावर कर्मचारी आगारात रूजू झाले आणि एसटीची सेवा सुरू झाली की या कारवाया मागे घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. २१ ऑक्टोबरला संपाची नोटीस दिली होती. संप शांततेत झाला. त्याला गालबोट देखील लागले नाही. १७ डिसेंबर रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करण्यात आली.

विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्याबाबत जो निर्णय येईल, तो आम्हाला मान्य आहे, असे गुजर यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, गुजर यांनी संपातून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतरही मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र संपातून माघार घेण्यास नकार दिला आहे. आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आणि लढा विलीनीकरणाचा समितीचे सदस्य सतीश मेटकरी यांनी आम्ही संपातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

एसटीतील २८ कर्मचारी संघटना आम्ही विसर्जित केल्या असून आता कर्मचारी उत्स्फूर्तपणे संप पुकारत असल्याचे मेटकरी यांनी यावेळी सांगितले आहे. आम्ही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून संपातून माघार घेणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतली असली तरी ठप्प झालेली एसटी सेवा पूर्ववत होणार का, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep related habits: झोपेबाबत 'ही' चूक कराल तर 172 आजार लागतील मागे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून खुलासा

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

SCROLL FOR NEXT