ST Driver News Saam TV
महाराष्ट्र

ST चालकाने मुलीचा मृतदेह नेला थेट आगारात; आगार प्रमुखावर केले गंभीर आरोप

एसटी चालक किशोर राठोड यांची १४ वर्षाची अंपग मुलगी सतत आजारी असायची.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : अंपग मुलीचा उपचार करण्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे सुट्टीची मागणी करुनही त्यांनी आपणाला सुट्टी न दिल्याने, मुलीचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत एका एसटी चालकाने (ST Driver) मुलीचा मृतदेह चक्क एसटी आगारात (ST) आणल्याची घटना समोर आली आहे.

दिग्रस आगारातील (Digras Depot) असून एसटी चालक किशोर राठोड यांची १४ वर्षाची अंपग मुलगी सतत आजारी पडत असल्याने, तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याकरिता एसटी चालक किशोर राठोड यांनी दिग्रसचे आगारप्रमुख संदीप मडावी यांना रजा देण्याची विनंती केली होती. मात्र, आगार व्यवस्थापकाने रजा न दिल्यामुळे एसटी चालकाची मुलगीचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत ST चालकाने मुलीचा मृत्यूदेह ऑटोने एसटी आगारात आणल्याने मोठी खळबळ उडाली होती.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी एसटी आगारात धाव घेत प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटी चालक आक्रमक होत आगार व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई जोपर्यंत करणार नाहीत, तोपर्यंत आगारातून हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलीसांपुढे ही मोठा पेच निर्माण झाला होता. उशीरापर्यंत या प्रकरणात कोणावरही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे आगार व्यवस्थापक आणि अन्य दोघे नेहमी चालक राठोड यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Sign: गोड बोलून काम करून घेण्यात हुशार असतात या ४ राशींच्या व्यक्ती

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर KKR कडून खेळणार? मुंबईसह हे 2 संघ लावू शकतात मोठी बोली

Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Car Driving Tips: कार चावलताना वारंवार झोप येतेय? तर 'या' टिप्स ट्राय करा....

Prajakta Mali: कामातून वेळ काढून तुझ्याकडे येईलच, प्राजक्तानं कुणाला केलं प्रॉमिस?

SCROLL FOR NEXT