भारत-पाक युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकाचा मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून Saam Tv
महाराष्ट्र

भारत-पाक युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकाचा मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात समोर आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड : काही गोष्टीसमोर सगळी नाती फिकी पडत असतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात समोर आला आहे. लहुजी नगर या ठिकाणी राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलाने मारहाण केली आहे. यामध्ये दगडाचा जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणराव साबळे यांनी १९६५ ते १९७१ या काळात झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धात यांचा सहभाग होता. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर या ठिकाणी राहणारे सेवानिवृत्त माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे राहत होते. ६ नोव्हेंबर दिवशी दुपारच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मुलगा विजय साबळे (वय-४५ वर्ष) यांनी वडिलांना मारहाण केली होती.

हे देखील पहा-

विजयची ४० वर्षीय पत्नी आणि १८ वर्षांचा मुलगा शुभम विजय साबळे यांनी देखील या मारहाणीत मदत केली आहे. विजयने वडिलांना बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली होती. यामध्ये दगडाचा जबर मार लागल्यामुळे वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि पत्नी गयाबाई यांनी अर्धापूर या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले आहे.

सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विजय नारायणराव साबळे, शुभम विजय साबळे, सौ. साबळे या तिघाजणांच्या विरूद्ध कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनास्थळी सापडली सुसाइड नोट, चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि परत मैदानात उतरा, फुटलेल्या खासदारांना उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

Maharashtra News Live Update: टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे - जयंत आंसगावकर

SIP Calculator: फक्त महिना २०,००० रुपयांमध्ये होऊ शकता ₹१ कोटीचे मालक, ते कसं आणि किती वर्षांत?, जाणून घ्या

Shruti Marathe: नथ, नऊवारी आणि दिलखेचक अदा; श्रुती मराठेचा पारंपरिक सौंदर्यावर चाहते फिदा

SCROLL FOR NEXT