Amravati violence : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा 3 दिवस बंदच Saam Tv
महाराष्ट्र

Amravati violence : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा 3 दिवस बंदच

अमरावती बंदला शनिवारी मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : अमरावती बंदला शनिवारी मोठ्या प्रमाणात हिंसक वळण amravati लागल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये, यासाठी अमरावतीत ३ दिवस इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे. सध्या अमरावती शहरामधील परिस्थिती नियंत्रणात असून शहरात शांतता पसरली आहे.

हे देखील पहा-

त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी बंद पुकारला होता. यावेळी हिंसाचार मोठ्या प्रमाणात उफाळून आला आहे. यावेळी राजकमल नगर, नमुना गल्ली, अंबापेठ भागात दुकाने आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. काही पानटपऱ्या देखील फोडण्यात आले आहेत. तसेच ५ ते ६ दुकानांना आग लावण्यात आली आहे.

यामुळे जमावाला पांगविण्याकरिता पोलिसांनी बळाचा वापर केला होता. अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यामुळे पोलिस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. तसेच हा हिंसाचार घडवून आणणाऱ्या लोकांना सोडणार नाही, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. सध्या अमरावती शहरामध्ये शांतता पसरली असून, नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे. दरम्यान, आज भाजपकडून परत एकदा बंदची हाक देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Masala Puri Recipe : गरमागरम चहा अन् रवा-मसाला पुरी, पावसात करा चटपटीत नाश्ता

Avneet Kaur: अवनीत कौरचा 'बोले चूड़ियां' लूक तुम्ही खास सोहळ्यासाठी करु शकता कॉपी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार? मंडळाने वेळ सांगितली

Maharashtra Live News Update: : विरार पोलीस ठाण्याच्या गणरायाचा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

Navratri Festival 2025: नवरात्र 2025 कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि पूजा माहिती

SCROLL FOR NEXT